ठाणे जिल्ह्यावर कॅन्सरचे सावट, तपासणीत आढळले शेकडो रुग्ण !
ठाणे जिल्ह्यातील मोठ्या कर्करोग तपासणी मोहिमेत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ८ लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासणीत २४३ जण कर्करोग संशयित आढळले. मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळला. या मोहिमेमुळे कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जनजागृती वाढेल आणि वेळीच उपचार मिळतील याची आशा आहे. सरकार आणि आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहेत.

कॅन्सर. नुसतं नाव घेतलं तरी धडकी भरते, मग तो आजार झालेल्या लोकांची काय अवस्था होत असेल? तोंड, पोट, स्तनाचा कर्करोग झालाय अशा अनेक माणसांबद्दल आपण ऐकतो. मराठी मनोरंजन सृष्टीतील नामवंत अभिनेत्री प्रिया मराठे हिचं काही दिवसांपूर्वीच कॅन्सरमुळे निधन झालं. तसंच हिंदी चित्रपटसृष्टी, टीव्हीमधील अनेक अभिनेत्री दीपीका कक्कड, हिना खान, मनिषा कोईराला, महिमा चौधरी यांनाही कॅन्सरने वेढलं होतं.
आपल्या ओळखी पाळखीच्यांनाही या आजाराने विळखा घातल्याचं आपण ऐकलं असेल. हे नाव आणि आजार जरी भीतीदायक असला तरी आजच्या आधुनिक जगात कॅन्सरवर बरीच चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे , औषध , केमोथेरपी,मुळे आजार बरं होण्याचंही प्रमाण वाढलं आहे. मात्र कॅन्सर झालाय किंवा त्याची शक्यता आहे असं ऐकल्यावर कोणालच्याही हृदयाचा थरकापच उडतो.
दरम्यान ठाणे जिल्ह्यात अलीकडेच राबवण्यात आलेल्या एका विशेष कर्करोग तपासणी मोहिमेमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तपासणी केल्यानंतर मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे शेकडो संशयित रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या तपासणी मोहिमेमध्ये 8 लाख 44 हजार 211 नागरिकांची तपासणी केली असता 243 रुग्ण कर्करोग संदर्भात संशयित आढळले. त्यापैकी 75 रुग्ण ग्रामीण भागातील असून बाकी 168 संशयित पालिका कार्यक्षेत्रातील आहे.
तपासणीत काय काय आढळलं ?
स्तन कर्करोग : 3.99 लाखांपेक्षा जास्त महिलांची तपासणी केली, ज्यात 107 महिलांमध्ये लक्षणे दिसून आली.
गर्भाशय कर्करोग : 49 हजार महिलांच्या तपासणीत 126 महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळली.
तर 33 संशयित रुग्णांची बायोप्सी केली असता त्यापैकी 16 जणांना मुख कर्करोगाचे निदान झाले.
तर यात महिलांचे मृत्यूचा आकडा देखील वाढला असून 12 महिलांना स्तनाच्या कर्करोगाने तर 3 महिलांच्या गर्भाशय कर्करोगाचे निदान झाल्याचे अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे .
सध्या जिल्ह्यात युद्धपातळीवर तपासणी मोहीम सुरू असून शासन स्तरावर आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार वेळेवर ती करावे अशी आवाहन देखील केले जात आहे.
