Jalgaon News: जळगाव हादरलं! अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी, नेमकं काय घडलं?
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहरूण येथील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. छबाबाई पाटील असे मृत महिलेचे नाव असून अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या डोके, पाय व हाताच्या अस्थी नेल्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहरूण येथील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. छबाबाई पाटील असे मृत महिलेचे नाव असून अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या डोके, पाय व हाताच्या अस्थी नेल्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी प्रशासनावर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिलेल्या अस्थींची चोरी
छबाबाई पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्यावर मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी अस्थी नेण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांनी धक्का बसला. छबाबाई यांच्या डोके, पाय व हाताच्या अस्थींची चोरी झाल्याचे समोर आले. अंगावरील सोने काढण्यासाठी अस्थी सुद्धा चोरून नेल्याचा आरोप मृत छबाबाई पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच त्यांनी आम्हाला सोनं नको, फक्त अस्थी परत करा, अशी मागणी केली आहे.
आमदार सुरेश भोळेंची सीसीटीव्हीची मागणी
या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेवरून आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढले असून, मेलेल्या नागरिकांचीही अस्थी सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे. आमदार भोळे म्हणाले की, ‘या घटनेमुळे पाटील कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही कावळ्यांनी अंगावरून सोनं काढून नेले आहे. आमची महापालिकेला विनंती आहे की, अशी घटना घडू नये यासाठी या ठिकाणी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉचमनची सोय करावी.’
महिलेचा मुलगा काय म्हणाला?
मयत महिलेचा मुलगा आर के पाटील यांनी म्हटले की, ‘आमच्या आईचे निधन झाले, काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक परंपरेसाठी आम्ही अस्थी नेण्यासाठी आलो होतो, मात्र अस्थी सुरक्षित नव्हत्या. डोक्याच्या, हाताच्या आणि पायाच्या अस्थी चोरीला गेल्या होत्या. याबाबत आम्ही प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. अस्थी परत मिळाव्या म्हणून आम्ही पोलीस तक्रारही देणार आहोत. मी महापालिकेला एक विनती करतो की, अशा अस्थी चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्यात यावी, सुरक्षा रक्षक देण्यात यावा आणि 24 तासांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावा.’
