AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! महिला डॉक्टरच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर, त्या 3 गोष्टी काय?

सातारा जिल्ह्यात २८ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ माजली आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हाताच्या तळव्यावर दोघांची नावे लिहित बलात्कार आणि छळाचे आरोप केले. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मोठी अपडेट! महिला डॉक्टरच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर, त्या 3 गोष्टी काय?
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 11:45 PM
Share

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. ही फक्त आत्महत्या नाही, तर नातेसंबंध, दबाव आणि व्यवस्थेच्या वास्तवाची एक वेदनादायी कथा बनली आहे. डॉक्टरच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेला नोट, पोलिस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप आणि एका टेक्निशियनसोबत बिघडलेले नाते यामुळे हे प्रकरण आणखी रहस्यमयी बनले आहे. या प्रकरणात सतत मोठे खुलासे होत आहेत. नुकत्याच झालेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधलो आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती. पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यमध्ये देखील वाद झाला होता. प्रशांत बनकरला राग अनावर झाला. त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. या हॉटेलच्या खोलीतच तिने स्वत:ला संपवून टाकले आहे. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

वाचा: महिला डॉक्टरचं भर रात्री चेकइन, 2 दिवसांसाठी रुम बूक…मधुदीप हॉटेलमधलं खळबळजनक गूढ समोर

हाताच्या तळव्यावर लिहिलेली सुसाईड नोट

सातारा पोलिसांच्या मते, डॉक्टरच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेली नोट ही तिच्या आत्महत्यचे गूढ उलघडणारी ठरत आहेत. यात पीएलआय आणि घरमालकाच्या मुलाचे (जो व्यवसायाने टेक्निशियन आहे) त्याचे नाव लिहिलेले आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भरतीय न्याय संहिता) कलम ६४ (बलात्कार) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. सुसाईड नोट व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्समधून नात्यातील तणाव आणि मानसिक दबावाची पुष्टी झाली आहे.

नातेसंबंध, लग्नाचा प्रस्ताव आणि आरोपांची गुंतागुंत

पोलिस तपासात समोर आलं की, डॉक्टर आणि टेक्निशियन यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून नाते होतं. पण गेल्या काही दिवसांपासून ते बिघडले होते. टेक्निशियनच्या कुटुंबाने दावा केला की, डॉक्टरने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला त्याच्या भावाने नाकारले होते. कुटुंबाचे म्हणणा आहे की, डॉक्टर सतत फोन करून त्रास देत होती. तर पोलिसांच्या मते, आरोपी टेक्निशियन तिच्यावर लग्न आणि शारीरिक संबंध कायम ठेवण्याचा दबाव टाकत होता. चॅट्समध्ये डॉक्टरने ‘तणाव’ आणि ‘डिप्रेशन’ सारख्या गोष्टी लिहिल्या होत्या.

पोलिस दबाव आणि राजकीय कनेक्शन

डॉक्टरच्या नातेवाईकांनी आरोप केला की, स्थानिक पोलिस पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होते. दुसरीकडे, शिवसेना (युबीटी) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत पूर्व भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सहाय्यकांवर दबाव टाकल्याचा दावा केला. निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटाळत म्हटलं की, “माझ्या नावाचा कोणत्याही दस्तऐवजात उल्लेख नाही, तांत्रिक तपास सत्य समोर आणेल.”

अटक आणि तपासाची दिशा

टेक्निशियनला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली तर पीएसआय गोपाळ बदनेने रात्री फलटण पोलिसांसमोर शरणागती पत्करली. कोर्टाने टेक्निशियनला २८ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता कॉल डिटेल्स, सोशल मीडिया रेकॉर्ड्स आणि चॅट्सची तांत्रिक तपासणी करत आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?