VIDEO : ओली बाळंतीन पाच दिवसाच्या मुलासह पुरात अडकली, माऊली मदतीला आला म्हणून जीव वाचला, चौघांना वाचवणारा देवमाणूस

माऊली गडदे यांनी स्वतः पहिल्यांदा जाऊन घटनास्थळी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना बोलून घेतले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने चौघांना सुखरूप बाहेर काढले (Social activist Mauli Gadade rescues mother and her son trapped in floods)

VIDEO : ओली बाळंतीन पाच दिवसाच्या मुलासह पुरात अडकली, माऊली मदतीला आला म्हणून जीव वाचला, चौघांना वाचवणारा देवमाणूस
ओली बाळंतीन पाच दिवसाच्या मुलासह पुरात अडकली, माऊली मदतीला आला म्हणून जीव वाचला, चौघांना वाचवणारा देवमाणूस

संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी (बीड) : परळी तालुक्यातील बोधेगाव येथे रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे ओढ्यास पाणी आले. पाण्याचा अंदाज न आल्याने जीप चालकाने पाण्यात जीप घातली, पण पाणी जास्त असल्याने गाडी वाहून चालली होती. गाडीत पाच दिवसांची ओली बाळंतीन, पाच दिवसाचे बाळ ड्रायवर आणि सहकारी महिला अडकून पडले. यात स्टेअरिंगपर्यंत पाणी आलं. दरवाजा उघडणं कठीण झालं (Social activist Mauli Gadade rescues mother and her son trapped in floods).

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ड्राव्हर गाडीच्या टपावर चढला. आरडाओरडा केला. त्यावेळी पडत्या पावसात ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून माऊली गडदे या जिगरबाज देवदूताने गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. यावेळी बाळासह सुखरूप बाहेर निघालेल्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांनी माऊलीचे पाय धरले. त्यानंतर चौघांना जीवनदान मिळवून देणाऱ्या माऊलीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

ड्रायव्हरची फोन करुन माऊलींकडे मदतीची विनंती

एक बोलेरो गाडी अंबाजोगाईच्या रुग्णालयातून बाळंतीण माता आणि पाच दिवसाच्या बाळाला घेऊन बोधेगाव मार्गे कासारी बोडका या गावी जात होती. यावेळी त्यांना पावसाने बोधेगाव जवळ झोडपले. पाण्याचा अंदाज न आल्याने ड्राव्हरने गाडी ओढ्यात घातली. गाडीत स्टेअरिंगपर्यंत पाणी आले. लहान बाळाला पोटाशी धरून ओली बाळंतीण गाडीत उभी होती. रात्री कोणीही मदत करण्यासाठी यायला तयार नव्हते.

ड्रायव्हरने सिरसाळा पोलीस बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गडदे यांना फोन करून त्या कुटुंबांना वाचविण्याचे आवाहन केले. माऊली गडदे यांनी स्वतः पहिल्यांदा जाऊन घटनास्थळी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना बोलून घेतले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने चौघांना सुखरूप बाहेर काढले.

माऊली गडदे यांची प्रतिक्रिया

“मी अगोदर सुरुवातीला सोल घेऊन पाण्यात उडी मारली. सुरवातीला गाडीला बांधून झाडाला बांधले. नंतर माणसं वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. सुरुवातीला पाच दिवसाच्या लहान मुलाला बाहेर काढले. पुन्हा हळूहळू सर्वांना सुखरूप बाहेर काढले. कासारी बोडखा येथील बडे कुटुंबातील ही माणसं होती. त्यांना पहाटे दोन वाजता पाणी कमी झाल्यानंतर गाडी काढून देऊन सुखरूप घरी पाठवले”, असे माऊली गडदे यांनी सांगितलं (Social activist Mauli Gadade rescues mother and her son trapped in floods).

घटनेचे व्हिडीओ बघा :

हेही वाचा : PHOTO | या फोटोंनी जिंकला नेचर फोटोग्राफी पुरस्कार 2021, पहा प्राणी आणि निसर्गाची अनोखी जुगलबंदी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI