बालाजीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात सोलापूरच्या तिघा भक्तांचा मृत्यू

चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि गाडी महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला धडकून मोठा अपघात झाला.

Solapur Pilgrims Telangana Accident, बालाजीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात सोलापूरच्या तिघा भक्तांचा मृत्यू

सोलापूर : तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या सोलापुरातील भक्तांवर काळाने घाला घातला. तेलंगणात झालेल्या जीपच्या भीषण अपघातात तिघा भक्तांचा मृत्यू (Solapur Pilgrims Telangana Accident) झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. दोन बालकांसह पाच जण किरकोळ जखमी आहेत.

तेलंगणातील वनपरती जिल्ह्यातील कोत्ताकोटाजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. अपघातात 25 वर्षीय सपना राजू कुनी, 50 वर्षीय शारदा कुनी, 45 वर्षीय दत्तात्रय धुळम या तिघांना प्राण गमवावे लागले.

कृष्णाहरी कुनी, यल्लप्पा कुनी, शैलेश धुळम, श्रेयस धुळम, कृष्णा कुनी, राजू कुनी, भक्ती कुनी हे सात जण अपघातात जखमी आहेत.

हेही वाचा : अस्थीविसर्जनाहून परतताना अपघात, यवतमाळमध्ये सात जणांचा मृत्यू

सोलापुरातील पूर्व भागात राहणारे धुळम आणि घरकुल परिसरात राहणारे कुनी कुटुंबातील सदस्य तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. कोत्ताकोटा भागात चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि गाडी महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला धडकून मोठा अपघात झाला.

अपघातातील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढून हैदराबाद आणि मेहबूब नगरला उपचारासाठी पाठवले. या अपघाताची नोंद तेलगंणातील कोत्ताकोटा पोलिस स्थानकात करण्यात आली (Solapur Pilgrims Telangana Accident) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *