AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत…; भरसभेत अजित पवारांचं आश्वासन

Ajit Pawar on Maharashtra Vishansabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. त्यांनी मोहोळमध्ये बोलताना राज्यातील नागरिकांना आश्वासन दिलं आहे. लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर....

पुन्हा युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत...; भरसभेत अजित पवारांचं आश्वासन
अजित पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Sep 22, 2024 | 2:02 PM
Share

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज सोलापूरमधील मोहोळमध्ये आहे. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी वीजबीलावर भाष्य केलं. पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बील माफ झालेले असेल. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल. काही योजना या आउट डेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचे नाही आणि मागचे बील द्यायचे नाही. पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बील माफ झालेले असेल. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असं अजित पवार म्हणाले.

मोफत वीज देण्याचं आश्वासन

काही योजना या आउट डेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचे नाही आणि मागचे बील द्यायचे नाही. आमचं सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला.

50% फी भरायला नव्हते म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. अरे मुली काय आत्महत्या करायला जन्माला येते की काय? म्हणून मी सचिवाला बोलवले आणि विचारले किती खर्च येईल. त्यानंतर आम्ही मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

अजित पवारांची मिश्कील टिपण्णी अन् एकच हशा

पुढील निवडणुकीमध्ये एक तृतीयांश महिला या लोकसभा आणि विधानसभेत जाणार आहेत. घरातील महिला सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी कामं करते. त्यांना कोणी आजपर्यंत विचारले का? आम्ही पण आम्हाला दोषी समजतो कारण मी पण इतके वर्षे त्याचा विचार केला नाही. माजी मंत्री सुनील केदार म्हणाले आम्ही सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू… ही योजना बंद करायला काय तुझ्या घरची योजना आहे का?, असं अजित पवार म्हणाले. त्याचवेळी उपस्थितांमधून आवाज आला की, बापाची योजना आहे का? त्यावर अजित पवार म्हणाले, बरोबर आहे, बरोबर आहे… मी तसं म्हणू शकत नाही. फार तर म्हणू शकतो, तुमच्या वडिलांचे आहे का? अजित पवारांच्या या मिश्किल टिप्पणीनंतर सभेत हशा पिकला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.