Dr. Ambedkar Jayanti Solapur: बाबासाहेबांच्या जयंतीला सोलापुरात नो ‘लफडा झाला वाकडा तिकडा’, वाचा नियमावली सविस्तर

Dr. Ambedkar Jayanti Guidelines: सोलापूरच्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सगळ्यांनी साजरी करावी असं म्हटलंय. मात्र डॉल्बीला किंवा डीजेला परवानगी देणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

Dr. Ambedkar Jayanti Solapur: बाबासाहेबांच्या जयंतीला सोलापुरात नो 'लफडा झाला वाकडा तिकडा', वाचा नियमावली सविस्तर
सोलापुरात नेमकं काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:12 PM

सोलापूर : 14 एप्रिल रोजी राज्यासह देशभरात आंबेडकर जयंतीचा (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) उत्साह पाहायला मिळेल. पण त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आतापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांची तयारी सुरु झालेली आहे. अशातच आयोजकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करता डॉल्बीला परवानगी (No permission for DJ) देण्यात आलेली नाही. त्यामुळे आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या थाटामाटात आयोजन करत डॉल्बी लावण्याच्या इराद्यात असणाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरलंय. तसंच या निर्णयामुळे नाराज झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोरोन महामारीमुळे (Corona Pandemic) गेली दोनही वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही साधेपणानं आणि निर्बंधातच साजरी केली गेली. मात्र आता राज्यातील निर्बंध उठवल्यानंतर सगळेच सण उत्साहात साजरे केले जात आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठीची लगबगही सुरु झालेली आहेच. त्यापार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

कोणत्या जिल्ह्यासाठी झाला निर्णय?

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरात यंदा आंबेडकर जयंतीमध्ये डॉल्बीला परवानगी नाकारण्यातआली आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी पोलिस आयुक्तालयाच घोषणाबाजीही केली आहे.

का नाकारली परवानगी?

सोलापूर पोलीस आयुक्तालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली. मात्र ही बैठक फिस्कटली आहे. डॉल्बीसाठी परवानगी नाकारण्यात आली असल्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशारा उत्सव समितीकडून देण्यात आला आहे. तर पोलिसांकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीप्रमाणेच डॉल्बीला किंवा डीजेला परवानगी नाकारली असल्याचं म्हटलंय.

बैठकीवेळी काय घडलं?

सोलापूरच्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सगळ्यांनी साजरी करावी असं म्हटलंय. मात्र डॉल्बीला किंवा डीजेला परवानगी देणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. यामागचं कारणही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. दरम्यान, यानंतर बैठकीसाठी मोठ्या संख्येनं आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी एकच घोषणाबाजी करण्यास सुरुवात पोलीस आयुक्तांच्या डीजेला परवानगी नाकारण्याच्या भूमिकेमुळे तीव्र नाराजी यावेळी घोषणाबाजीतून व्यक्त करण्यात आली.

काय आहे नियमावली?

  1. कोरोना महामारीत असलेले कोणतेही निर्बंध आंबेडकर जयंतीसाठी नाहीत
  2. एकत्र येण्यावरही बंधन नाहीत
  3. कार्यक्रमांच्या आयोजनांवरही निर्बंध नाहीत
  4. आंबेडकर जयंतीदिनी डीजे लावण्याला परवानगी नाही
  5. 75 डेसिबलच्या वरती आवाज नसावा, या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याचे निर्देश

इतर बातम्या :

Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!

Dhule Fire : धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू

Nanded Crime | दोन तलवारी हातात घेत सोशल मीडियावर भाईगिरी, तरुणासह आई वडिलांनाही अटक

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.