AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही… मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने मोठी खळबळ

Manoj Jarange Patil Big Statement: मराठा आंदोलक मनोज जरांगे हे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने संतप्त आहे. त्यांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपूरमध्ये एका सभेत बोलताना जरांगे पाटील असे काही बोलून गेले की त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता वादळ येण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange: जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही... मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने मोठी खळबळ
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Aug 09, 2026 | 2:20 PM
Share

कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतप्त आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. बावनकुळे यांच्या आदेशानेच प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार सभा होणार आहे. त्यापूर्वी सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर एका सभेत त्यांनी एक जहाल वक्तव्य केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

तर जीव घेऊ शकतो

बावनकुळेंच्या एका चुकीमुळे मराठा समाज चिडला आहे. कुणबी प्रमाणपत्रांना हे बोगस म्हणतायत, हे मंत्रीच बोगस आहेत. मराठ्यांमध्ये राज्यात त्यामुळे नाराजीची लाट आहे. बावनकुळेंमुळे फडणवीस अडचणीत आले आहेत. सरकार माझा जीव घेण्याचं प्रयत्न करत आहे, आणि मी देखील जीव देणार आहे. मात्र सूड घेणार, सरकारला सोडणार नाही. मी जर जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही घेऊ शकतो असे जहाल वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात होणार चार जाहीर सभा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. सांगलीच्या आटपाडी कवठेमंकाळ, बोरगाव आणि कडेगाव येथे सभा होणार आहेत. जरांगे पाटील आज आटपाडी येथे त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी त्यांची जाहीर सभा आटपाडी मध्ये पार पडणार आहे. तर उद्या सकाळी कवठेमंकाळ तालुक्यात दौरा करून त्यांची सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे येथे मराठा समाजाच्या वतीने दुपारी तीन वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे जरांगे पाटील यांचे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे

प्रमाणपत्रे रद्द का केलीत?

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकूनच मंत्री बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र खरे असूनही रद्द करण्याचे काम केले आहे. प्रमाणपत्रे रद्द का केलीत हे फडणवीस आणि शिंदेंनी सांगावे असे जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांनी नवे डाव रचले आहेत. रोड बंदोबस्त धाराशिव पासून बंद केला. माझ्यावर हल्ला झाला पाहिजे. दगडफेक झाली पाहिजे. हाणामारी व्हावी असा डाव होता, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. सत्ताधाऱ्यांना माज आला आहे. त्यांचा माज उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कुणबी प्रमाण पत्र रद्द करण्याचे बावनकुळेनी केलेल्या कामाची कल्पना फडणवीसांना असणारच. या सरकारमध्ये एकाही मंत्र्याला स्वत:ची भाकर खायचे देखील अधिकार नाहीत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा