पंढरपुरात विजेचा शॉक लागून दोघांचा जीव गेला! अख्खा गाव शोकसागरात, तर 2 मुलांचं छत्र हरपलं

पंढरपुरात विजेचा शॉक लागून दोघांचा जीव गेला! अख्खा गाव शोकसागरात, तर 2 मुलांचं छत्र हरपलं
पंढरपुरात शॉक लागून दोघांचा दुर्दैवी अंत
Image Credit source: TV9 Marathi

Pandharpur Electric Shock : राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे या दोघांना शेतात पाणबुडी मोटार लावण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार ते मोटार बसवण्याच्या कामाला लागले. मात्र या कामादरम्यान विजेचा शॉक लागून...

रवी लव्हेकर

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 18, 2022 | 9:34 PM

पंढरपूर : मृत्यू कुणाला कधी, कसा आणि कुठे गाठेल, याचा काहीही नेम नाही. पंढरपुरातील चळे तालुक्यातील (Taluka Chale, Pandharpur) एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोघांचा शॉक लागून जागीच जीव गेला आहे. यातील एक तरुण विवाहीत होता तर दुसरा अविवाहीत होता. दरम्यान, दोघांच्या मृत्यूनं संपूर् गाव शोकाकूल झाला आहे. शेतात पाण्याची मोटार (Water motor in Farm) सोडण्यासाठीचं काम करत असतेवेळी विजेचा प्रवाह पाण्यात उतरला आणि मोटारीचं काम करण्यासाठी उतरलेल्या दोघांचा शॉक लागून (Electric Shock) जागीच जीव गेला. या घटनेनं संपूर्ण गावाला धक्का बसलाय. तर मृतांमधील एकाची दोन मुल पोरकी झाली आहे. त्यांच्या डोक्यावरील छत्र हरपल्यानं आता आपलं पुढे काय होणार, असा प्रश्न चिमुरड्यांसमोर उभा ठाकलाय.

धक्कादायक

पंढरपुरातल्या चळे तालुक्यात ही घटना घडली. धुळवडीचा उत्साह सगळीकडे सुरु असताना चळे गाव मात्र शोकसागरात बुडालाय. शुक्रवारी दुपारच्या सुमारास चळे तालुक्यातील गावात एका शेतकऱ्यानं नवीनं मोटार घेतली होती. सणाच्या दिवशी मोटार लावण्याचं प्रयोजन होतं. यासाठी दोघांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी मोटार लावताना पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यानं ही धक्कादायक घटना घडली.

मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा

राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे या दोघांना शेतात पाणबुडी मोटार लावण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार ते मोटार बसवण्याच्या कामाला लागले. मात्र या कामादरम्यान विजेचा शॉक लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. यातील आनंद हा विवाहित होता. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याची दोन्ही मुलं पोरकी झाली आहे. तर राजेंद्र हा तरुण अविवाहित होता. मात्र त्यांच्याही कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या दोन्ही शेतमजुरांचा शॉक लागून मृत्यू झालानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या :

बुलढाण्यात शेतातील विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

Swift चा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तब्बल 18 दिवसांनी त्याचं पार्थिव भारतात येणार, युक्रेन युद्धात भारतीयांच्या जखमा भेगाळल्या

पाहा व्हिडीओ :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें