Sambhaji Bhide : संभाजी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज, सोलापूरमध्ये तणावाचं वातावरण

संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. मात्र भिडे समर्थक त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्येही भिडे समर्थक जमले असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

Sambhaji Bhide : संभाजी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज, सोलापूरमध्ये तणावाचं वातावरण
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 5:59 PM

सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यभर त्यांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे संभीजी भिडे यांचे समर्थक त्यांना समर्थन देताना दुग्धाभिषेक घालत आहेत. अशाच प्रकारे सोलापुरमध्ये भिडेंच्या समर्थकांकडून पोलीस प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्येच भिडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यासोबतच भिडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, साई बाबा, महात्मा फुले आणि बाहेर राज्यातील समाजसेवकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. त्यासोबतच त्यांना अटक करण्याची मागणीही केली जात आहे.

विधानसभेतही संभाजी भिंडेंच्या अटकेची मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्येही संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, संभाजी भिडे जिथे असतील तिथून त्यांना उलचून अटक करण्याची मागणी केलीये. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकार भिडेंना संरक्षण देत असल्याचं वाटत आहे, असं आव्हाड म्हणाले.

यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आजही पत्रकारांशी बोलताना, माझ्यासोबत काही बर-वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ठाकूर यांनी केला.

दरम्यान, संभाजी भिडेंबाबत शासनाने ठाम भूमिका घ्यावी, इतिहासामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.