AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी घेणार?; शरद पवार म्हणाले, 35 जागांवर…

Sharad Pawar on PM Narendra Modi and Adam Master : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज सोलापुरात आहेत. इथे बोलताना शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींवर पवारांंनी टीकास्त्र डागलं. तसंच महाविकास आघाडी आणि आगामी निवडणुकांबाबतचं जागावाटप यावरही ते बोललेत.

प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी घेणार?; शरद पवार म्हणाले, 35 जागांवर...
| Updated on: Jan 20, 2024 | 10:48 AM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 20 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने महाविकास आघाडी आणि जागा वाटपावर शरद पवारांनी भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार का? याची मागच्या काहीदिवसांपासून चर्चा होतेय. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत बोलणं झालं आहे. 48 जागापैकी ठिकाणी 35 जागांवर एकमत आहे. बाकीच्याबाबत चर्चा सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.

रोहित पवारांना ईडीची नोटीस

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अनिल देशमुख, संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं. पण कोर्टाने चार्जशीट पाहून मुक्तता केली. ईडी चा वापर हे सरकारचे हत्यार आहे. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जातोय. रोहित पवारांना एकट्याला नाही. तर सर्वच नेत्यांना ईडीचा धाक दाखवला जातोय. पण आम्ही शांत बसणार नाही. आम्ही कोर्टात जाऊन लढणार आहोत, असंही शरद पवारांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींवर टीका

सोलापुरात बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी काय भूमिका होतात याकडे लक्ष होतं. या प्रकल्पाचं श्रेय आडम मास्तर यांना जातं. अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत.कालचा लोकार्पण झालेला प्रकल्प आडम मास्तर यांचा आहे. विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल चार चांगले बोलले असते तर बरं दिसलं असतं, असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थित होते. पण शहरातील औद्योगिकरण याबाबत विचार झाला पाहिजे. या नेत्यांची जबाबदारी आहे की, सोलापूर ही औद्योगिक नागरी होती. मात्र आता इथे उद्योग वाढला पाहिजे. कारण कामासाठी सोलापूर सोडून लोकांना बाहेर जावं लागतं, असंही शरद पवार म्हणाले.

पवार- शिंदे एकाच व्यासपीठावर

शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आज एकाच व्यासपीठावर पहायला मिळतील. काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार आणि शिंदे उपस्थित आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.