Solapur : सोलापूरमधील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या हुंड्यासाठीच; पती आणि सासऱ्यासह तिघांना अटक, दहा जणांवर गुन्हा दाखल

Solapur : सोलापूरमधील 'त्या' मायलेकींची आत्महत्या हुंड्यासाठीच; पती आणि सासऱ्यासह तिघांना अटक, दहा जणांवर गुन्हा दाखल
सोलापूरमधील 'त्या' मायलेकींची आत्महत्या हुंड्यासाठीच

लग्नानंतर सासरच्या लोकांकडून सारिकाचा छळ सुरु झाला. माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून मयत सारिका यांना सतत अपमानित करणे, नवीन कपडे न घेणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, माहेरी फोनवर बोलू न देणे, दोन्ही मुलीच झाल्याने टोचून बोलणे, मारहाण करणे असा छळ सुरू केला.

रोहित पाटील

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 23, 2022 | 2:59 PM

सोलापूर : दोन मुलींसह विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास तालुका पोलिसांना(Taluka Police) यश आले आहे. सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून विवाहितेने शेततळ्यात दोन्ही मुलींस उडी घेऊन आत्महत्या(Suicide) केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास आला असून पती(Husband)सह तिघांना अटक करण्यात आली आहे. पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे (22), सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे (54), दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे (25) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत तर अनिता उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे (रा. पाथरी), विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे (नंदगाव, तुळजापूर), साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड, छकुली (रा. पाथरी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Suicide of a married woman in Solapur for dowry only; Three arrested along with her husband and father-in-law)

सासरच्यांकडून सतत मानसिक आणि शारिरीक छळ होत होता

सारिका अक्षय ढेकळे (22) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी अक्षय ढेकळेसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून सारिकाचा छळ सुरु झाला. माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून मयत सारिका यांना सतत अपमानित करणे, नवीन कपडे न घेणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, माहेरी फोनवर बोलू न देणे, दोन्ही मुलीच झाल्याने टोचून बोलणे, मारहाण करणे असा छळ सुरू केला.

शेततळ्यात उडी घेऊन केली आत्महत्या

अखेर या छळाला कंटाळून सारिका आपल्या दोन्ही मुलींसह घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्याजवळ गेली आणि मुलींसह पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत सारिकाची आई लक्ष्मीबाई व्यंकट सुरवसे (40, रा. नंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरा व दीर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी करीत आहेत.

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे, सासरा उत्तम मच्छिद्र ढेकळे आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे या तिघांना शनिवारी न्यायदंडाधिकारी आर. ए. मिसाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नावगिरे, एडवोकेट श्रीपाद देशक तर सरकारतर्फे बनसोडे काम पाहत आहेत. (Suicide of a married woman in Solapur for dowry only; Three arrested along with her husband and father-in-law)

इतर बातम्या

Pimpri Chinchwad crime| पिंपरीत पतीच्या निधनांतर विधवेवर पाळत ठेवण्यासाठी दीर व सासऱ्याने घरात बसवले सीसीटीव्ही ; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Wardha Crime | आर्वीतील गर्भपात प्रकरण, कदमकडं सापडला कुबेराचा खजाना!; नऊ तासांत पोलिसांनी नेमकं काय शोधलं?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें