“सरकार मायबाप, पावसाआधी आमची शाळा दुरुस्त करा”; विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांसमोर टाहो…

शाळेची दुरवस्था झाल्यामुळेच संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी साईओंची भेट घेऊन शाळा दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला पावसाळा सुरु होण्याआधी चार वर्ग खोल्या बांधून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सरकार मायबाप, पावसाआधी आमची शाळा दुरुस्त करा; विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांसमोर टाहो...
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 6:07 PM

सोलापूर : सध्या मे महिना सुरु असल्याने आणि पावसाळ्याआधी काही इमारतींच्या डागडूजींची कामं सुरु आहेत. मात्र राज्याील काही शाळांची दुरावस्था असल्याने आता पालकांबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यानीही आपल्या शाळेसाठी प्रशासनाचे दार ठोठावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधील आळगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबरच विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे शाळा दुरुस्तीची मागणी करत ते वेळेत पूर्ण झाले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी सीईओ यांची भेट घेऊन आपल्या शाळेबद्दलची झालेली दुरवस्था सांगितल्याने आळगी शाळा आता राज्यभरात चर्चेत आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगीमधील शाळेचा स्लॅबमधून पावसाचे पाणी गळत असते. त्यामुळे येत्या पावसाळ्यात तरी शाळेची इमारत दुरुस्त करुन द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शाळेच्या इमारतीची अवस्था वाईट झाल्यामुळेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या दुरावस्थेविरोधात साईओंचे कार्यालय गाठले आहे. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाळेची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे पालकांतून चिंता व्यक्त केली जात होती. यावर्षी अनेक वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळीही अनेक वेळा शाळेत पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती.

याबाबत अनेक वेळा शाळा दुरुस्त करण्याची मागणी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्षे केले गेल्याने विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंची थेट भेट घेतली आहे.

आळगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे. विद्यार्थी ज्या वर्गात बसतात त्या खोल्यांचे स्लॅब आता कोसळण्याच्या मार्गावर असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

पाऊस आला की, संपूर्ण वर्गात पाणी गळती सुरु होते. तसेच वर्गातील स्लॅब केव्हाही कोसळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विध्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

शाळेची दुरवस्था झाल्यामुळेच संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी साईओंची भेट घेऊन शाळा दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला पावसाळा सुरु होण्याआधी चार वर्ग खोल्या बांधून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे निवेदन दिले आहे. तसेच लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.