AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | माढ्यासाठी मोहिते पाटील का महत्त्वाचे? आकडे काय सांगतात?

माढा लोकसभेत शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. शरद पवारांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते कुटुंबानं भाजपला रामराम करत हाती तुतारी घेतलीय. धैर्यशील मोहिते १६ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माढ्यासाठी मोहिते महत्त्वाचे का आहेत? आकडे काय सांगतात? पाहूयात हा रिपोर्ट!

Special Report | माढ्यासाठी मोहिते पाटील का महत्त्वाचे? आकडे काय सांगतात?
माढ्यासाठी मोहिते का महत्त्वाचे? आकडे काय सांगतात?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 14, 2024 | 10:21 PM
Share

माढ्यात अखेर भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. धैर्यशील मोहिते पाटील 26 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर जेव्हा शरद पवार पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विजयसिंह मोहिते हजर होते. शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, शेकापच्या जयंत पाटलांसह इतर अनेक नेत्यांशी चर्चेनंतर मोहितेंनी थंब दाखवत दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत राहिली. लवकरच अकलूजमधल्या सभेत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील, शिंदेंच्या शिवसेनेचे करमाळ्यातील नेते नारायण पाटलांचा होणारा प्रवेश भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी धक्का आहे. तर भाजपच्या उमेदवारावर नाराज असलेले स्वतः रामराजे निंबाळकर आणि त्यांचे दोन्ही बंधूदेखील लवकर मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा सुरु आहे. तसं झाल्यास शरद पवारांकडून अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असेल.

मोहिते कुटुंबानं 2019 ला राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. मोहितेंच्या वर्चस्वामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर जिंकून आले. माळशिरसमधल्या भाजप आमदाराच्या विजयातही मोहितेंचा वाटा मोठा राहिला. मात्र नंतरच्या काळात भाजपकडून मोहिते अडगळीत पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यंदा मोहितेंचे पुतणे धैर्यशील मोहिते उमेदवारीसाठी इच्छूक होते. पण भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनाच तिकीट दिलं. तेव्हापासून मोहिते भाजप सोडण्याच्या चर्चा होत्या. मात्र भाजपचे आमदार असलेले विजयसिंहांचे पुत्र रणजितसिंह मोहिते भाजपात थांबावं, यासाठी आग्रही होते. पण विजयसिंह, त्यांचे बंधू जयसिंह आणि पुतणे धैर्यशील मोहिते भाजप सोडण्यावर ठाम होते.

मोहिते शरद पवारांसाठी का महत्वाचे? भाजपसाठी धक्का का असेल?

विजयसिंह मोहिते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्रीपदं भूषवली आहेत. जनसंपर्क आणि कामांमुळे माढा मतदारसंघात मोहितेंना माननारा मोठा वर्ग आहे. 2009 च्या लोकसभेत स्वतः शरद पवार माढ्यात 3 लाखांहून जास्त मतांनी जिंकून आले. 2014 च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते माढ्यातून राष्ट्रवादीचे खासदार झाले. आणि 2019 ला भाजप प्रवेशानंतर भाजपचा खासदार निवडून आणण्यातही मोहितेंचा रोल मोठा राहिला.

  • 2019 ला भाजपचे निंबाळकर राष्ट्रवादीच्या बबन शिंदेंविरोधात 85764 मतांनी जिंकले. राष्ट्रवादीला करमाळा, माढा आणि सांगोल्यात लीड होतं. माळशिरस, माण, फलटणमध्ये निंबाळकर पुढे होते. पण निंबाळकरांच्या 85 हजारांच्या विजयी मताधिक्क्यांत एकट्या मोहिते पाटलांच्या माळशिरसचा वाटा 1 लाखांचा होता.
  • 2019 चा माढ्यातील निकाल तालुकानिहाय बघितला, तर करमाळ्यात भाजपच्या निंबाळकरांना 71 हजार 503 मतं पडली, राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंना 1 लाख 1 हजार 932
  • माढ्यात निंबाळकरांना 98 हजार 562, संजयमामा शिंदेंना 1 लाख 5 हजार 67
  • सांगोल्यात निंबाळकरांना 78 हजार 746, संजयमामा शिंदेंना 82 हजार 120
  • माळशिरसमध्ये निंबाळकरांना 1 लाख 43 हजार 22, संजयमामा शिंदेंना 42 हजार 395
  • फलटणमध्ये निंबाळकरांना 94 हजार 879, संजयमामा शिंदेंना 93 हजार 666
  • माणमध्ये निंबाळकरांना 96 हजार 476, संजयमामा शिंदेंना 73 हजार 261 मतं पडली
  • करमाळा, माढा, सांगोला या ३ ठिकाणी राष्ट्रवादीला लीड होतं. तर माळशिरस, माण आणि फलटणध्ये भाजपचे निंबाळकर पुढे राहिले. मात्र भाजपच्या निंबाळकरांच्या विजयात गेमचेंजर माळशिरस ठरलं होतं.

कुणाचा कुणाला पाठिंबा?

या घडीला भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढा, करमाळ्यातून अजित पवार गटाच्य शिंदें बंधूंचा पाठिंबा आहे. मान-खटावचे आमदार जयकुमार गोरे सोबत आहेत. दुसरीकडे सांगोल्यातील शेकापचं देशमुख कुटुंब मोहितेंच्या सोबत आहे. करमाळ्यातून नारायण पाटलांनी पाठिंबा दिलाय. फलटणमधून अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर मोहितेंसोबतच राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मोहितेंचे कारखाने, शिक्षण संस्थांचं जाळं असल्यानं मध्यंतरी कारवायांच्या भीतीनं त्यांचा प्रवेश लांबल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्या सर्व चर्चांना जयसिंह मोहितेंनी खोटं ठरवलंय. 2019 ला मोहितेंनी साथ सोडल्यानंतर माढा मतदारसंघात कमळ फुललं. त्यावेळी बदललेली समीकरण भाजपला अनुकूल ठरली. 2024 ला मोहिते पुन्हा पवारांकडे परतले आहेत, राज्यातलं समीकरणही बदललंय. त्यामुळे यंदा माढ्यात काय होणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?