खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ, सोयाबीन तेलही महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

नागपूरमध्ये सोयाबीनसह सर्व खाद्यतेलांच्या किमंतींमध्ये वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका बसत आहे. (Soybean Oil Price Hike)

खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ, सोयाबीन तेलही महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
नागपूरमध्ये खाद्यतेलाचे दर वाढलेत
Yuvraj Jadhav

|

Jan 06, 2021 | 11:42 AM

नागपूर: खाद्यतेलामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाच्या (Soybean Oil Price Hike) दरामध्ये वाढ झालीय. खाद्यतेलांच्या किमंतीमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपये किलो प्रमाणं मिळणार सोयाबीन तेल 135 रुपयांवर पोहोचलं आहे. (Soybean and other oil price hike in markets of Nagpur)

नैसर्गिक आपत्ती, विदर्भातील पूरस्थिती यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पादन कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोयाबीन तेलाच्या किमंतीमध्ये 35 रुपयांची वाढ झाली आहे.

सोयाबीनसह सर्व खाद्य तेलांच्या दरात वाढ

सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किंतीत वाढ झाल्याने, सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय. दोन महिन्यात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या खाद्यतेलाचे दर 35 रु. प्रति किलो वाढलेय. त्यामुळे किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचा दर आता 135 रुपये किलोंवर पोहोचले आहेत. पाम तेलाच्या दरातंही वाढ झाली असून, किरकोळ बाजारात पाम तेलाचे दर १४५ रुपये किलोंवर पोहोचलेय. यंदा देशात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घाटलंय, त्यामुळेच देशात सोयाबीन आणि पामच्या कच्च्या तेलाची 60 टक्के आयात झालीय. आयातखर्च वाढल्यानेदेशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. याचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय.

कोरोनामुळे आधीच लोकं आर्थिक संकटात आहेत, त्यात आता खाद्यतेलाच्या दरवाढीचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागतोय.

दरवाढीवर व्यापाऱ्यांची भूमिका

सोयाबीन तेलांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे नागपूरमधील व्यापाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे मार्ग काढण्याची मागणी केलीय. ज्ञानेश्वर रक्षक यांनी दरवाढीमुळे ग्राहकांना फटका बसत असल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात, असं सांगितले. आयातीचा खर्च वाढल्यामुळे दरवाढ होतीय. शासनानं यामध्ये हस्तक्षेप करुन सामंजस्यानं मार्ग काढावा. दरवाढ रोखण्यासाठी शासनानं प्रयत्न करण्याची मागणी चिल्लर व्यापारी संघ, नागपूरचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर

तेल प्रति किलो दर

सोयाबीन 135 रु.

सूर्यफूल 145 रु.

शेंगदाणा 160 रु.

पाम 130 रु.

जवस 130 रु.

राईस 135 रु.

संबंधित बातम्या:

GST Fraud | गल्लीत गुटखा बनवणाऱ्याकडून 871 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अधिकारीही चक्रावले

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी 2000 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव

(Soybean and other oil price hike in markets of Nagpur)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें