ST Strike | Kolhapurमध्ये ST कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह मोर्चा
एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employees strike) सुरू आहे. आज आक्रमक झालेल्या एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबीय आणि श्रमिक संघटनांनी आज कोल्हापुरातील (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Morcha) काढला.
गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employees strike) सुरू आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबीय आणि श्रमिक संघटनांनी आज कोल्हापुरातील (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Morcha) काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून या आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेत आपल्या व्यथा मांडल्या. आजपर्यंत या एसटी संपाला पाठिंबा दिला, आता मात्र आम्हीसुद्धा संपात उतरून कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी दिलाय. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीव्यतिरिक्त इतर सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र कर्मचारी विलीनीकरणावरच ठाम आहेत. यामुळे दिवाळीपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
