AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ओबीसींसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट जीआर काढला, आता A टू Z हिशोब होणार!

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर आता ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचीच दखल घेऊन आता राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. याचा फायदा आता ओबीसींना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! ओबीसींसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट जीआर काढला, आता A टू Z हिशोब होणार!
obc committee
| Updated on: Sep 03, 2025 | 6:05 PM
Share

Committee for OBC : मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढच्या एका महिन्यात सातार गॅझेटही लागू केले जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता ओबीसी समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओबीसी आंदोलकांकडून सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी केली जात आहे. ओबीसींमध्ये ही अस्वस्थता पसरलेली असतानाच आता सरकराने ओबीसीच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. 

नेमका निर्णय काय?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मराठा व्यक्तीला कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा दाखला मिळावेत यासाठी नवा जीआर काढला आहे. त्यानंतर आता ओबीसींसाठीही सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीप्रमाणेच एखादी समिती आसावी असा सरकारचा विचार होता. ओबीसींच्या न्याय, हक्कांसाठी एक समिती असावी असे सरकारचे मत होते. अशी समिती स्थापन करण्याची मागणी अगोदरच मान्य झाली होती. आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे.  

ओबीसींच्या समितीत कोण कोण असणार?

ओबीसींसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्षपदी आहेत. तसेच  छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे मंत्री सदस्य आहेत. या समितीत भाजपाचे 4, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन मंत्री आहेत. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम, योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे.

दरम्यान, आता सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर ओबीसींच्या शंकाचे निरसण केले जाईल. तसेच ओबीसींचे आक्षेप समजून घेऊन त्याबाबत निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.