आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Workers from Maharashtra are stuck in Telangana) आहे.

आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 3:33 PM

चंद्रपूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Workers from Maharashtra are stuck in Telangana) आहे. लॉकडाऊन घोषित केल्यामुळे राज्यातील अनेक नागरिक इतर राज्यात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून व्यवस्था केली जात आहे. चंद्रपूर-गडचिरोतील एकूण 26 हजार मिरची तोड मजूर तेलंगणा-आंध्र प्रदेशात अडकले आहेत. या मिरची तोड मजुरांना परत आणण्यासाठी राज्याची टास्क फोर्स याबाबत इतर राज्यांशी चर्चा करत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी (Workers from Maharashtra are stuck in Telangana) दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले,” इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी राज्य सरकार 450 बसेस पाठवणार आहेत. मजूर गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासोबत कुणी नियम मोडल्यास त्याला दोन हजार रुपये दंडाची शिक्षाही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने परती नंतरच्या परिस्थितीसाठी पाच सूत्री कार्यक्रम आखला आहे.”

चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील हजारो मजूर मिरची तोड कामाच्या निमित्ताने परराज्यात अडकले आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यात चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर परतीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व मजुरांची अवस्था तिथल्या शेत शिवारात दयनीय झाली आहे. गेले दीड महिना हे सर्व मजूर महाराष्ट्र सरकारकडे परतीची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत. राज्य शासनाने आंध्र आणि तेलंगणा राज्याशी चर्चा करत यातून मार्ग काढला आहे.

राज्यात या मजुरांना परत आणण्यासाठी एका टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. सुमारे 26 हजार मजुरांना चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आणले जाणार आहे. यासाठी 450 बसेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

यासोबतच एवढ्या मोठ्या संख्येतील मजूर परतल्यावर त्यांना गावाने कोरोना संबंधी खबरदारी घेण्यासाठी पाच सूत्री नियमावली आखली जाणार आहे. राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे शेत शिवारात-चिखलात-उन्हात तापत असलेल्या आणि अन्न-पाणी यांची सोय नसलेल्या मजुरांना दिलासा मिळणार आहे.

स्थलांतरित मजुरांसाठी तेलंगणाहून पहिली ट्रेन रवाना

स्थलांतरित मजुरांसाठी तेलंगणाहून आज (1 मे) पहिली ट्रेन झारखंडसाठी रवाना झाली आहे. एकूण 1200 मजूर या ट्रेनमधून प्रवास करत आहेत. आज पहाटे 4 वाजता ही ट्रेन तेलंगणावरुन निघाली, अशी माहिती रेल्वे पोलीस महासंचालक यांनी दिली.

राज्याबाहेर अडकलेल्या सर्वांना परत आणणार

“इतर राज्यात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत आणले जाणार आहे. परप्रांतीय मजूर त्यांना त्यांच्या राज्यात परत पोहचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

संबंधित बातम्या :

चंद्रपूरमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना GPS ट्रॅकिंग लावण्याचा विचार : विजय वडेट्टीवार

Maharashtra LockDown | 3 मेनंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.