AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:..

आज जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आला आहे, यावर आता सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:..
Supriya SuleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 22, 2025 | 9:08 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिकवेळ चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु आज जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

बंद दाराआड चर्चा 

जयंत पाटील हे जेव्हा अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात आले तेव्हा तिथे गर्दी होती. मात्र जयंत पाटील यांनी कक्षात प्रवेश करताच सर्वांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

महाराष्ट्रात सशक्त लोकशाही आहे, त्यामुळे लोक एकमेकांना भेटत असतात. मी स्वत: अश्विनी वैष्णव यांना अर्धा तास भेटून आले आहे. बारामतीच्या विकासासंदर्भात ही बैठक होती. शिवराज सिंह चौहान, अमित शाह यांना देखील आम्ही भेटत असतो. लोकशाहीमध्ये भेटी गाठी झाल्या पाहिजे, संवाद झाला पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हापासून हे सरकार आलं आहे,  तेव्हापासून 100 दिवसांत या सरकारचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, या शंभर दिवसांमध्ये एका मंत्र्याची व्हिकेटही गेली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मी गेल्या महिन्यापासून हेच सांगत आहे, की महाराष्ट्रात निधीची कमतरता आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या,

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका