AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवारांनी काय कानमंत्र दिला?; सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत

Supriya Sule Post About Loksabha Session 2024 : आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या काळात सुप्रिया सुळे यांनी एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. शरद पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट शेअर केलीय. वाचा सविस्तर...

लेक चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवारांनी काय कानमंत्र दिला?; सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत
सुप्रिया सुळे, शरद पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Jun 24, 2024 | 6:52 PM
Share

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला तो बारामती लोकसभा मतदारसंघ… सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार या लढतीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. अशातच आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिनेशनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केलाी. यात शरद पवार यांनी दिलेल्या शिकवणीचा त्यांनी उल्लेख केला आहे. पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवार यांनी एक कानमंत्र दिला होता. तो आजही लक्षात आहे, असं सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शरद पवारांनी दिलेली शिकवण काय?

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या मनातील भाव मांडले आहेत.  ‘सुप्रिया, तू खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर एक ने आत जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणिव ठेव’, असं शरद पवार यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर मला सांगितलं होतं. ते आजही माझ्या स्मरणात आहे, असं सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांची पोस्ट जशीच्या तशी

लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हि माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. कृतज्ञतापूर्वक हे नमूद करते की, माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. मला आजही लक्षात आहे की, जेंव्हा मी २००९ साली पंधराव्या लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून पाऊल ठेवले तेंव्हा आदरणीय पवार साहेब यांनी मला एक शिकवण दिली. ते म्हणाले होते की,

“सुप्रिया, तु खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर एक ने आत जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणिव ठेव.”मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रवेश करते तेंव्हा तेंव्हा साहेबांची हि वाक्ये मला आठवतात.

यंदाच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा लोकांच्यावरील असलेला विश्वास अधिक दृढ झाला. आपण योग्य मार्गावर असाल तर लोक तुम्हाला आयुष्यभर साथ-सोबत करतात याचाही प्रत्यय आला. हि खासदारकी जनतेच्या कामासाठी आहे, पुढील पाच वर्षांतील प्रत्येक क्षण हा केवळ जनतेसाठी आणि जनहिताच्या कामासाठी गेला पाहिजे याकडे माझा कटाक्ष असणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हा सर्वांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा आदर्श घालून दिला आहे. हे सुत्र कायम डोळ्यांसमोर ठेवून चालण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते.

सलग चौथ्या वेळी संसदेत प्रवेश करीत असताना मला वाढत्या जबाबदारीची जाणिव आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिल. लोकहिताचे मुद्दे संसदीय चौकटीत राहून मात्र अत्यंत आग्रही पणे सभागृहात मांडून त्याची तड लावण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन. लोकांनी माझ्यावर वेळोवेळी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी यापुर्वी देखील मी अविरतपणे काम केले आहे. हा वसा यापुढील काळात देखील कायम राहिल, हे वचन यानिमित्ताने देते.

या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.या निवडणूकीत प्रचारासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, विविध राजकीय संघटना यांसह सर्व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतमंडळी, प्रिंट-टिव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वच हितचिंतक सर्वांचे मनापासून आभार. यापुढील काळातही आपले सहकार्य असेच मिळत राहील ही अपेक्षा.

धन्यवाद.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.