रोहित पाटील की संजयकाका पाटील? जनतेचा कौल कुणाला? तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

Tasgaon Kavathe Mahankal Assembly Constituency Election 2024 : राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मतदारसंघ चर्चेत आहेत. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची या निवडणुकीत चर्चा होत आहे. तासगाव कवठेमहांकाळमध्ये काय घडतंय? वाचा सविस्तर...

रोहित पाटील की संजयकाका पाटील? जनतेचा कौल कुणाला? तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
रोहित पाटील, संजय पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 3:11 PM

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या सांगलीतील तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ… (Tasgaon Kavathe Mahankal Assembly Constituency) या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष आहे. यंदा या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील (Rohit R R Patil) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्यात लढत होत आहे. या लढतीला वेगवेगळे कंगोरे आहेत. यंदाच्या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरणार? याबाबत जाणून घेऊयात….

तासगाव- कवठेमहांकाळमधील लढत

राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढत आहेत. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या तिथल्या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा आपल्याकडे राहावी म्हणून भाजपचा प्रयत्न होता. पण शेवटी अजित पवार गटाला ही जागा गेल्याने संजयकाका पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आता घड्याळ चिन्हावर संजयकाका पाटील हे तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढत आहेत.

कोणते मुद्दे चर्चेत

सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्न यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा असणार आहे. ‘टेंभू’ चं पाणी यंदाच्या निवडणुकीचं तापमान वाढवणार आहे. तसंच संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात गेले होते. यावेळी त्यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीच्या फाईलवर सही केली, असं विधान केलं. आर. आर. पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीवरही अजित पवार बोलले. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा झाली. हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील निकाल

सुमन आर. आर. पाटील यांना 1 लाख 28 हजार 371 मतं मिळाली होती. अजित घोरपडे यांना 65 हजार 839 मतं मिळाली होती. त्यामुळे यंदा या मतदारसंघात काय घडतं? कोण ही निवडणूक जिंकतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...