AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थी 1 पट तर शिक्षक 10 पट, थेट विद्यार्थ्यांच्या हेअरस्टाईलसाठी शिक्षकच सलूनमध्ये..

मुलांच्या हेअर स्टाईल, केस कापणे ही गोष्ट अलीकडे पालकांसाठी चांगलीचं डोकेदुखी बनली आहे. मुलांच्या केस कापण्याच्या पद्धतीवर पालकांची ओरड राहते. यातच आता शिक्षकांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला.

विद्यार्थी 1 पट तर शिक्षक 10 पट, थेट विद्यार्थ्यांच्या हेअरस्टाईलसाठी शिक्षकच सलूनमध्ये..
Sangli School
| Updated on: Oct 06, 2026 | 8:28 AM
Share

सांगली प्रतिनिधी शंकर देवकुळे : शाळेतील मुलाची हेअरस्टाईल पालक आणि शिक्षकाची डोकेदुखी ठरत आहे. हल्लीच्या काळात फॅशन बदलतेय. त्यासोबत मुलांच्या हेअरस्टाईलही बदलत आहे. शाळेतील मुलाची केसांची हेअरस्टाईल पाहून ही शाळा आहे की फॅशन शो असा प्रश्न पालक आणि शिक्षकांना पडत आहे. पण यावर सांगलीच्या मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी यावर भन्नाट उपाय शोधला आहे. पोरांचे केस कापायचे आहेत तर मग आधी गुरुजींना फोन करा आणि सलूनमधून फोन आला की गुरुजी थेट सलूनमध्ये जातात आणि मगच केस कापायचे काम सुरू होते.  फळ्यावर धडे गिरवले जातात आणि शिक्षक विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करतात, पण लक्ष्मीवाडीच्या या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरही लक्ष दिलं आहे कारण विद्यार्थ्यांच्या बदलत्या हेअरस्टाईलने शिक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुलांच्या हेअर स्टाईल, केस कापणे ही गोष्ट अलीकडे पालकांसाठी चांगलीचं डोकेदुखी बनली आहे. मुलांच्या केस कापण्याच्या पद्धतीवर पालकांची ओरड राहते. केस कापण्यावरून आणि हेअर स्टाईल वरून पालका आणि मुलांच्या मध्ये वादावादीचे प्रकार घडत असतात. पण मुलांच्या समोर पालकही हतबल बनतात.

मात्र सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी येथे पालकांचा हा त्रास कायमचा संपला कारण. इथं केस कापण्यासाठी पालक नव्हे तर सलूनमध्ये मुलांच्या समोर चक्क गुरुजी उभे राहतात, आणि कोणतीही हेअर स्टाईल कट किंवा फॅशनला फाटा देऊन साध्या पद्धतीने मुलांची केस कापून घेतात. ऐकून थोडसं आश्चर्य वाटेल पण हे सगळं लक्ष्मीवाडीमध्ये शिक्षकांच्या कल्पक बुद्धीने हे घडत आहे.त्यासाठी शिक्षकांनी मग पालकांशी संवाद साधला.

पालक मुलाला घेऊन किंवा मुलगा सलूनमध्ये गेल्यावर मुलांचे केस कापताना सलून वाले ने आमच्याशी म्हणजे शिक्षकांशी एकदा फोनवर बोला.एवढंच पालकांना सांगितलं आणि या छोट्याशा कल्पनेने मोठा परिणाम घडवून आणला.मुलं सलूनमध्ये गेले की,पहिला फोन गुरुजींना आणि फोन येताच गुरुजी थेट सलूनमध्ये पोहचतात.

विशेष म्हणजे शिक्षकांनी हा निर्णय विद्यार्थ्यांवर लादला नाही. पालकांशी संवाद साधला पालकांना विश्वासात घेतलं आणि त्यातूनच या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यामुळे शिक्षकांचा हा प्रयोग पालकांनीही स्वीकारला. कारण मुलांच्या हातात उद्याचं भविष्य आहे आणि त्या भविष्याला आकार देण्यासाठी शाळा आणि घर दोघांनीही एकत्र यायला हवं.

Follow Us
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...