‘मातोश्री’शी कौटुंबिक संबंध… तरीही शिवसेनेची रणरागिणी थेट भाजपात; कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
Tejasvee Ghosalkar : मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता... तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का... कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

Tejasvee Ghosalkar : मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण असताना राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आता तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घडलेली ही फार मोठी घडामोड आहे.. ठाकरे गटाला रामराम करत तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात ही पक्षप्रवेश सोहळा पार पडला… अशात शिनसेनेच्या रणरागिणी असणाऱ्या तेजस्वी घोसाळकर कोण आहेत, याबद्दल जाणून जाणून घ्या… एवढंच नाही तर, भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे कुटुंबाची साथ सोडणं फार कठीण आहे.. असं देखील घोसळकर म्हणाल्या.
तेजस्वी घोसाळकर यांच्या पतीची हत्या
तेजस्वी घोसाळकर यांचे राजकारणाशी जवळचे संबंध आहेत. तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत आणि त्यांचे पती अभिषेक घोसाळकर हे बीएमसीचे माजी नगरसेवक होते. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातील अभिषेक यांचं दुर्दैवी निधन झालं. स्थानिक रहिवासी मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने तेजस्वी यांच्या कुटुंबात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
ठाकरे कुटुंबासोबत घोसाळकर कुटुंबियांचं नातं…
घोसाळकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यामध्ये फार जवळचं नातं आहे. तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या अंतिमसंस्कारसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या… दरम्यावर, तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला राजीनामा न देण्यासाठी त्यांना खूप समजावण्यात आले.
पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे कुटुंबाने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले, परंतु त्यांनी आपला निर्णय बदलला नाही.
ठाकरे कुटुंबाबद्दल काय म्हणाल्या तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, ‘पक्ष आणि ठाकरे कुटुंब सोडण फार कठीण आहे. कायम त्याच पक्षाने ओळख दिली… निर्णय घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता… मी ज्या प्रकारे शिवसेनेत काम करायचे, त्यापेक्षा जास्त काम भाजपमध्ये करेल…’ असं देखील तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
