एकाच दिवशी दोन राजकीय भूकंप… मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का तर ठाण्यात शरद पवार गटाला मोठं खिंडार; बड्या नेत्याचा प्रवेश होणार
महापालिका निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय पक्षांतरे तीव्र झाली आहेत. ठाण्यात तेजस्विनी घोसाळकर यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला. दुसरीकडे, वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले मयूर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलून राष्ट्रवादी व ठाकरे गटासमोर आव्हाने उभी राहिली आहेत.

महापालिका निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा विविध पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाही गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रवेश होत असून आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत तेजस्विनी घोसाळकर यांनी भाजपाची वाट धरली. घोसाळकर यांनी ठाकरे गट (Thackrey faction) शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनमा दिला. त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे कारण घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानलं जातं, पण आता त्यांच्याच सुनेने भाजपात प्रवेश केल्याने खळबळ माजली आहे.
असं असतानाच दुसरीकडे ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून ठाण्यात काल विविध पक्षांचे कार्यालय उद्घाटन झाले. तसेच तिथेही विविध पक्ष प्रवेशदेखील मोठ्या संख्येने होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे, त्यामागचं कारण म्हणजे अनेक गंभीर गुन्ह्यांचा ठपका असणारा मयूर शिंदे हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Faction) पक्षाला रामराम करत भाजपमध्ये (BJP) प्रक्ष प्रवेश करणार आहे. मयुर शिंदे राष्ट्रवादी सोडणार असल्याने पक्षासाठी धक्कादायक ठरू शकतं.
मयूर शिंदे याच्यावरती असणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ही न्यायप्रविष्ट आहे. त्याच्याविरोधात कुठल्याही गंभीर गुन्हाची नोंद नसल्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि ठाणे शहर अध्यक्ष संजय लेले यांनीही सांगितलं आहे.
मयुर शिंदेची भाजपमध्ये घरवापसी
या आधी मयूर शिंदे शिवसेनेमध्ये सक्रिय होता. पण त्याच मयूर शिंदेने 2017 साली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. आणि आता 8 वर्षांनी त्यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होत आहे. ठाण्यातील सावरकर नगर आर जे ठाकूर महाविद्यालय येथील पटांगणात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मयूर शिंदे यांचा भाजप पक्षात पक्ष प्रवेश होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. मयुर शिंदे यांच्यावर कोणतेही गंभीर गुन्ह्याचे आरोप नसल्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले आहे.
कोण आहे मयुर शिंदे ?
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा मयूर शिंदे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भारतीय जनता पक्षात जाणार आहे. शिंदे याच्यावरती अनेक आरोप आहेत. मयूर शिंदे हा पिल्ले यांचा सदस्य म्हणून ओळखला जात होता. 2011 साली बांधकाम व्यवसायिक वैभव कोकाटे यांच्यावरती गोळीबार केल्याचा आरोप होता. तर 2016 साली पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मयुर शिंदेला अटक करण्यात आली होती. त्याला मुंबईमधून तडीपार केल्यानंतर त्याने ठाण्यामध्ये आश्रय घेतला.
2017 साली तो शिवसेनेमध्ये होता, मात्र तिथे उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्याने भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. तर 10 एप्रिल 2022 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली त्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला होता, तेव्हा त्याला युवक कार्याध्यक्ष पद मिळाले होते. नावावर गुन्ह्याची नोंद वाढल्यानंतर त्याची सत्ताधाऱ्यांशीची जवळीक वाढली.
2023 मध्ये संजय राऊत आणि सुनील राऊत यांना फोन वरून धमकी दिल्याप्रकरणात मयुर शिंदे याला अटक झाली होती. महाविकास आघाडी सरकार असताना मयुर हा शिवसेनेमध्ये सक्रिय होता. शिवसेनेचे एकनाथ शिंदे,भाजप चे नेते रवींद्र चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारपक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या सर्व दिग्गज नेत्यांसोबत मयूर शिंदे कार्यरत होता.
