AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती’ 14 गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणार, एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

लोकांना मूलभूत सुविधा पालिकेच्या माध्यमातून घेता येतील. आता तशा सूचना आम्ही दिल्या आहेत. 2015 साली हा ठराव पालिकेने केला होता. दुर्दैवाने हा निर्णय आतापर्यंत प्रलंबित राहिला होता. या लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

'ती' 14 गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणार, एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
'ती' 14 गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणारImage Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 10:17 PM
Share

ठाणे, हेमंत बिर्जे / अमजद खान : ठाणे महानगरपालिकेलगतच्या 14 गावांना (14 Villages) नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला नगरविकास विभागा (Urban Development Department)ने मंजुरी दिली आहे. तशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे या गावांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सुनियोजितपणे विकास करणं शक्य होणार आहे. सभागृहात सर्वांचे तसे मत होते. सर्वांचे मत लक्षात घेऊन आज आम्ही घोषणा केली. लोकांना मूलभूत सुविधा पालिकेच्या माध्यमातून घेता येतील. आता तशा सूचना आम्ही दिल्या आहेत. 2015 साली हा ठराव पालिकेने केला होता. दुर्दैवाने हा निर्णय आतापर्यंत प्रलंबित राहिला होता. या लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. (14 villages adjoining Thane Municipal Corporation will be included in Navi Mumbai Municipal Corporation)

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेली 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

राजू पाटलांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

दरम्यान या निर्णयानंतर 14 गाव सर्व पक्षी संघर्ष समितीतर्फे आमदार पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. कोविडमुळे अधिवेशन होत नव्हते. काल अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. आज 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची लक्षवेधी मांडली. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली जातील असा दुजोरा पालकमंत्री शिंदे यांनी दिला आहे. हा लढा त्या ठिकाणच्या संघर्ष समितीचा आहे. याचे सर्व श्रेय त्या गावातील एकजुटीला देत असल्याचे मान्य करीत आमदार पाटील यांनी पालकमंत्र्याचे आभार मानले आहेत.

या 14 गावात पाच ग्रामपंचायती होत्या. ग्रामपंचायतीमुळे पाहिजे तसा गावांचा विकास होत नव्हता. गेल्या तीन निवडणुकांवर या गावांनी बहिष्कार टाकला होता. ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात यावीत अशी ग्रामस्थांची मागणी होती. ही मागणी मनसे आमदार पाटील यांनी उचलून धरली. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पालकमंत्री शिंदे यांनी गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात येतील असे मान्य केले, अशी प्रतिक्रिया संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील यांनी दिली. (14 villages adjoining Thane Municipal Corporation will be included in Navi Mumbai Municipal Corporation)

इतर बातम्या

Thane : ठाण्यात नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी “मॉर्निंग वॉक प्लाझा”, महापालिका आयुक्तांची नवी संकल्पना

बिल न भरल्याने कल्याण ग्रामीणमधील स्ट्रीट लाईट बंद, विधानसभेत भाजप आमदारांकडून प्रश्न उपस्थित

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.