Dombivali : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवले

उद्या शाळेचा शेवटचा दिवस होता. आज वर्गात सर्व मुले बसली होती. याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी मुलाला एका रुममध्ये एकटेच बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरलेली नाही. तुला इथेच बसावे लागेल, असे सांगितले. जवळपास तीन तास मुलगा वर्गात एकटाच बसला होता.

Dombivali : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवले
शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवलेImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:39 PM

कल्याण : शाळेची फी थकीत असल्याने दहावीच्या एका विद्यार्थ्या (Student)ला शाळेने शिक्षा (Punishment) देत या विद्यार्थ्याला एकटेच तीन तास एका रुममध्ये बसविले. जोपर्यंत तुझे आई वडील येणार नाही, तोपर्यंत इथेच बसावे लागेल असे फर्मान सुनावले. या मुलाची मानसिक परिस्थिती ढासळली आहे. त्याला भोवळ आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या शाळेच्या विरोधात शिक्षण प्रशासनाकडून काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. डोंबिवली आजदेपाडा येथे राहणारे मनोज धुरी यांचा 16 वर्षीय मुलगा हा एमआयडीसी निवासी परिसरातील ग्रीन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्षात शिकत आहे. नववी इयत्ता पास केल्यावर त्याच्या शाळेत दहावीच्या वर्गाचे क्लास सुरु आहेत. (As the school fees were not paid one student was kept alone in a separate classroom for three hours)

उद्या शाळेचा शेवटचा दिवस होता. आज वर्गात सर्व मुले बसली होती. याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी मुलाला एका रुममध्ये एकटेच बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरलेली नाही. तुला इथेच बसावे लागेल, असे सांगितले. जवळपास तीन तास मुलगा वर्गात एकटाच बसला होता. आपल्या मित्रांसमोर त्याची इज्जत गेली. ही शिक्षा दिल्यानंतर चंदनची तब्येत बिघडली. त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. प्राथमिक उचपार करीत त्याच्या पालकांना बोलावून घेतले.

शाळेकडून आरोपांचे खंडन

पालकांचा आरोप आहे की, लॉकडॉऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. नोकरी गेली. आम्ही फी भरु शकत नाही. मात्र पैसे हाती येताच फी भरु असे सांगितले. पण मुलाला दिलेली शिक्षा अत्यंत वाईट आहे. यापूर्वीही त्याला शाळेने वर्गाच्या बाहेर उभे केले होते. शाळा प्रशासनाने पालकांच्या आरोपांचे खंडन करीत दोन वर्षापासून फी थकीत आहे. फी भरण्याचा तगादा विद्यार्थ्याकडे लावला नाही. त्यांच्या पालकाना फी भरण्यास सांगितले. त्याच्या पालकांना बोलावून घेतले होते. तोपर्यंत एका वर्गात त्याला बसवून ठेवले. कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही मानसिक त्रास दिलेला नाही. (As the school fees were not paid one student was kept alone in a separate classroom for three hours)

इतर बातम्या

Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.