VIDEO : लाखो दिल की धडकन असलेली ‘ऑडी’, पार्किंगमध्ये उभी असताना अचानक कशी पेटली?

ठाण्यात एक विचित्र आणि प्रचंड धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑडी ही कार पार्किंगमध्ये उभी होती. पण पार्किंगमध्ये उभी असताना कारच्या बोनेटच्या बाजूला अचानक आग लागली.

VIDEO : लाखो दिल की धडकन असलेली 'ऑडी', पार्किंगमध्ये उभी असताना अचानक कशी पेटली?
पार्किंगमध्ये उभी असताना कार अचानक कशी पेटली?


ठाणे : ठाण्यात एक विचित्र आणि प्रचंड धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑडी ही कार पार्किंगमध्ये उभी होती. पण पार्किंगमध्ये उभी असताना कारच्या बोनेटच्या बाजूला अचानक आग लागली. ही आग जास्त भडकत गाडीच्या काचेपर्यंत पोहोचली. त्यामुळे बोनेटचं पूर्णपणे नुकसान झालं. गाडीचं बोनेट पूर्णपणे जळून खाक झालं आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

ऑडी कार घ्यायचं, असं अनेकांचं स्पप्न असतं. ही कार तितकीच महागडी देखील आहे. त्यामुळे या कारचे व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहेत. एवढ्या महागड्या कारला आग लागू शकते, मग साध्या कारचं काय? असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या अशा घटना अतिशय दुर्मिळपणे घडतात. गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

घटना नेमकी कशी घडली?

संबंधित घटना ही ठाण्याच्या नौपाडा भागात घडली आहे. नौपाडा येथील गिरीराज सोसायटीत पार्किंगमध्ये गाडी उभी होती. पण अचानक गाडीच्या बोनेटच्या दिशेला आग लागली. सुदैवाने गाडीच्या आजूबाजूला कोणतीही गाडी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील अनेक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघ्याची मोठी गर्दी जमा झाली. काहींनी मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून या घटनेचे फोटो, व्हिडीओ काढले.

जीवितहानी नाही, गाडीचं प्रचंड नुकसान

ऑडी कारला आग लागल्याची घटना शनिवारी (24 जुलै) साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाटं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ऑडी कारचं प्रचंड नुकसान झालं आहे.

घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : साताऱ्यातील 379 गावे बाधित, 1,324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3,024 जनावरांचा मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI