Video : मंत्री, खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांचा 200 वडापाववर ताव, पण, बील न देताच चले जाव? नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेवरील लोकलच्या ठाणे-दिवा या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण काल करण्यात आलं.

Video : मंत्री, खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांचा  200 वडापाववर ताव, पण, बील न देताच चले जाव? नेमकं प्रकरण काय?
भाजप नेत्यांकडून वडापावर ताव
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:06 AM

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेवरील लोकलच्या ठाणे-दिवा या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण काल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांनी दिवा ते ठाणे लोकल प्रवास केला. यानंतर भूक लागल्यानं ठाणे स्टेशन बाहेरील गजानन वडापाव सेंटरमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वडापाव, भजी खालले. मात्र, या वडापावचे बील न भरताच निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. सोशल मीडियावरुन देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

पाहा व्हिडीओ

नेत्यांनी मारला ताव…

ठाण्यात मंत्री आणि खासदारांनी वडापाव आणि भजींवर ताव मारला. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याकडे आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला आणि त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडा पाव वर ताव मारलाय. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण ताव मारला आणि बील न देताचं ते निघून गेले.

प्रकार कसा उघडकीस आला

मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या पाठोपाठ कार्यकर्त्यांनी गजानन वडापाव सेंटरवर वडापाववर ताव मारल्यानंतर सर्वजण निघून गेले. यानंतर त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा बिलासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर विरोधकांना आयता मुद्दा मिळायला नको म्हणून कार्यकर्त्यांनी या प्रकरणारवर पडदा टाकण्यासाठी बील भरलं.

इतर बातम्या:

‘पंतप्रधान मोदींचे सहकार्य नेहमीच महाराष्ट्राला लाभतं, पुढेही लाभेल’ – मुख्यमंत्री; ठाण ते दिवा 5 आणि 6 व्या मार्गिकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai Murder Case : लष्करातील जवान हत्येच्या आरोपातून 27 वर्षांनी निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.