Mumbai Murder Case : लष्करातील जवान हत्येच्या आरोपातून 27 वर्षांनी निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

आरोपी जवानाच्या पत्नीचा मृत्यू 'हत्या' होता असे मानणे कठीण आहे. सरकारी पक्षाचा यासंदर्भातील दावा स्वीकारला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निकाल देताना नोंदवले आणि जवानाला हत्येच्या आरोपातून निर्दोष सोडले.

Mumbai Murder Case : लष्करातील जवान हत्येच्या आरोपातून 27 वर्षांनी निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 10:14 PM

मुंबई : लष्करामध्ये कार्यरत असताना दारुच्या नशेत पत्नीची हत्या करणार्‍या जवाना (Soldier)ला मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)ने 27 वर्षांनी निर्दोष ठरवले आहे. हत्या झाल्याचा दावा करण्यात आलेल्या महिलेच्या शरीरावर तिला पतीकडून मारहाण झाल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत ही वस्तुस्थिती विचारात घेत उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपी लष्करी जवानाने सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने त्याच्या अपिलाची गंभीर दखल घेतली आणि त्याला दोषमुक्त ठरवत मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. (Army soldier acquitted of murder charge, Mumbai High Court verdict)

सत्र न्यायालयाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणातील आरोपी लष्करी जवानाला सत्र न्यायालयाने 1998 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पत्नीची गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने जवानाला दोषी ठरवले होते. घटना घडली त्यावेळी आरोपी जवान पाटणा येथील दानापूर येथे भारतीय लष्करात तैनात होता. हत्येच्या आरोपासह पत्नीचा छळ केल्याप्रकरणीही सत्र न्यायालयाने जवानाला दोषी ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या आदेशाला लष्करी जवानाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी केली.

महिलेची हत्या झाल्याचा दावा स्वीकारता येणार नाही : उच्च न्यायालय

आरोपी जवानाच्या पत्नीचा मृत्यू ‘हत्या’ होता असे मानणे कठीण आहे. सरकारी पक्षाचा यासंदर्भातील दावा स्वीकारला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निकाल देताना नोंदवले आणि जवानाला हत्येच्या आरोपातून निर्दोष सोडले. महिलेच्या शरीरावर तिला मारहाण झाल्याच्या कुठेही खुणा नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले, तर आरोपीने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. उभय पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

जुलै 1995 मध्ये घडली होती घटना

जुलै 1995 मध्ये आरोपी जवानाने दारुच्या नशेत त्याची पत्नी मोनिका हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. मृत महिलेचे कुटुंबीय रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना महिलेच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी जवानाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे 1998 मध्ये जवानाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (Army soldier acquitted of murder charge, Mumbai High Court verdict)

इतर बातम्या

Hijab : हिजाब परिधान करणे इस्लामची धार्मिक प्रथा नाही; कर्नाटक सरकारने हायकोर्टात मांडली ही बाजू

Kalyan : धावत्या एक्सप्रेसमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ‘तिने’ 12 तास पकडून ठेवले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.