AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hijab : हिजाब परिधान करणे इस्लामची धार्मिक प्रथा नाही; कर्नाटक सरकारने हायकोर्टात मांडली ही बाजू

कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दिक्षीत आणि न्यायमूर्ती जे. एम. काझी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी महाधिवक्ता नवदगी यांनी साबरीमाला आणि तिहेरी तलाक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ दिला.

Hijab : हिजाब परिधान करणे इस्लामची धार्मिक प्रथा नाही; कर्नाटक सरकारने हायकोर्टात मांडली ही बाजू
हिजाब वादाचा कर्नाटक हायकोर्टात उद्या फैसला
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 18, 2022 | 10:00 PM
Share

बंगळुरू : शाळा, महाविद्यालयांमध्ये हिजाब (Hijab) परिधान करण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अजून पडदा पडलेला नाही. कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court)ही आज या प्रकरणाची सलग सहाव्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी कर्नाटकमधील भाजपच्या बोम्मई सरकारने बाजू मांडली. सरकारने हिजाब परिधान करण्यास केलेल्या मनाईचे समर्थन करीत आजच्या सुनावणी वेळी जोरदार युक्तीवाद केला. हिजाब परिधान करणे ही इस्लाम धर्माची प्रथा नाही. संविधानाच्या कलम 19(1) अन्वये मिळणार्‍या मूलभूत अधिकारांचाही हा भाग नाही, असे म्हणणे सरकारने मांडले आहे. (The Karnataka government argued in the High Court in the Hijab case)

महाधिवक्ता नवदगी यांनी सरकारची बाजू मांडली

कर्नाटक सरकारच्या वतीने महाधिवक्ता प्रभुलिंग नवदगी यांनी उच्च न्यायालयापुढे बाजू मांडली. शाळा, महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोषाख परिधान करण्यास आम्ही मनाई केली आहे. त्याच अनुषंगाने हिजाब परिधान करण्यासही बंदी घातली आहे. मात्र याबाबतीत कर्नाटक सरकारला ज्या प्रकारे दडपण्यात आले, तसेच इतर काही कारणांमुळे आमच्यावर कसा आरोप केला गेला? आम्ही मुली व महिलांशी भेदभाव करत आहोत, असे म्हटले गेले, हे सगळे पाहून आम्हाला दुःख झाले आहे. आमची सर्वांना समान वागणूक देण्याची भूमिका आहे, असे नवदगी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुस्लिम विद्यार्थिनींनी सरकारच्या आदेशाविरोधात दाखल केल्या आहेत याचिका

कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दिक्षीत आणि न्यायमूर्ती जे. एम. काझी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी महाधिवक्ता नवदगी यांनी साबरीमाला आणि तिहेरी तलाक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ दिला. हिजाबने घटनात्मक नैतिकता आणि वैयक्तीक प्रतिष्ठेच्या कसोटीत स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे म्हणणे त्यांनी मांडले.

कर्नाटक सरकारच्या वतीने नवदगी म्हणाले की, राज्य सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. राज्य सरकारला धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करायची मुळीच इच्छा नाही. कलम 131 अंतर्गत राज्याला अधिकार आहेत, असा युक्तिवाद नवदगी यांनी सुनावणीवेळी केला. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि पुढील सुनावणी सोमवारी, 21 फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे हिजाब वादाचा निर्णय प्रलंबित राहिला आहे. (The Karnataka government argued in the High Court in the Hijab case)

इतर बातम्या

मोदींच्या भाषणात अहमदाबाद, गांधीनगरचा उल्लेख, मुंबई हायस्पीड ट्रेनचा मुद्दा पुन्हा तापणार?

Ahmedabad Serial Blast: देशात पहिल्यांदाच 38 जणांना फाशी, आरोपींची नावे वाचा एका क्लिकवर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली