AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मीरा भाईंदर पालिकेत आरोप-प्रत्यारोप, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. (bjp shivsena shivaji maharaj mira bhayandar)

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मीरा भाईंदर पालिकेत आरोप-प्रत्यारोप, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मीरा भाईंदर महानगरपालिका
| Updated on: Feb 24, 2021 | 7:27 PM
Share

ठाणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने फेटाळून लावल्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. पुतळा उभारण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात अल्यामुळे हा शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यासारखं आहे, असा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. तर शिवसेना राजकारण करत असल्याचं म्हणत भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले. (bjp shivsena criticize each other on shivaji maharaj statue in mira bhayandar)

मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर येथे छत्रपती शिवाजी माहाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेने आज महापालिकेत मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, शिवसेनेला विरोध करीत सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचं प्रताप नाईक यांनी म्हटलं. तर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी शिवसेनेचे सर्व आरोप फेटाळून लावत शिवसेना राजकारण करत असल्याचं म्हटलं.

शिवसेनेकडून राजकारण करण्याचं काम

यावेळी बोलताना, “शिवाजी महाराजांच्या पुतळा मीरा भाईंदरमध्ये असावा अशी मागणी भाजपने केली होती. या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. पुतळा उभारणीचे काम सुरुही आहे. मात्र, शिवसेना फक्त राजकरण करत आहे. कोणत्याही पक्षाने याचा विरोध केला नाही. शिवसेनेतर्फे चुकीची बातमी शहरात पसरवली जात आहे,” असे ज्योत्स्ना हसनाळे म्हणाल्या.

लवकरच जोडे मारो आंदोलन

दरम्यान, भाजपने पुतळा उभारणीचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपने महाराष्ट्राची जाहीर माफी मागवी अशी मागणी केली आहे. तसेच, आम्ही हा विषय राज्य सरकारकडून मंजूर करून आणू, असेही सरनाईक म्हणाले. तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजपच्या स्थायी समिती सदस्यांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

Navi Mumbai Municipal Election 2021 : नवी मुंबईत मतदारांची हेराफेरी, एका मतदाराचा भाव पाचशे रुपये!

corona vaccination : तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.