‘कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही’, जितेंद्र आव्हाड यांचं रक्तदान आवाहन

जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकांना रक्तदानाचं आवाहन करत स्वतः रक्तदान करुन नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन दिलं.

'कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही', जितेंद्र आव्हाड यांचं रक्तदान आवाहन
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 5:16 PM

ठाणे : सध्या महाराष्ट्रात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकांना रक्तदानाचं आवाहन केलं. ते केवळ आवाहन करुनच थांबले नाही, तर त्यांनी स्वतः रक्तदान करत नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन दिलं. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आलेली आहे. असं असतानाच आता रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे (Blood donation by Jitendra Awhad amid shortage of blood during Covid time).

सध्या पुढील 8 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यानंतर आव्हाड यांनी स्वतः शुक्रवारी (2 एप्रिल) दुपारी खोपट येथील ब्लडलाईन रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, ” राज्यातील रक्ततुडवड्याची समस्या पाहता कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे तरूण-तरुणींनी कोविडला न घाबरता फिजीकल डिस्टन्सिंगचा अवलंब करून रक्तदान करावे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा, मास्कचा वापर करावा.”

‘बोले तैसे चाले’, आधी आवाहन, आता थेट कृती

कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाच राज्यात 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुण-तरुणींना रक्तदान करण्याचं आवाहन केलं. स्वेच्छा आणि निस्वार्थी भावनेने रक्तदान करा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी  स्वतः यावर कृती करत नागरिकांना प्रोत्साहन दिलं.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हे आवाहन केलं होतं. राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा, असं ट्विट आव्हाड यांनी केलं होतं.

मुंबईत कहर वाढला

मुंबईत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल 45 हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे. राज्यात काल तब्बल 43 हजार 183 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज 7 ते 8 हजार कोरोनाबाधित आढळत आहे. तसेच मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या 1 मार्च 2021 मध्ये 9 हजार 690 कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. तर काल 1 एप्रिलला महिनाभरात ही संख्या तब्बल 55 हजार 005 वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

राज्यात रक्ताची कमतरता; जितेंद्र आव्हाड यांनी केलं ‘हे’ आवाहन

वसईत महारक्तदान शिबिराचं आयोजन, नागरिकांच्या मतदानाप्रमाणं रक्तदानासाठी रांगा

101 वऱ्हाडींचे रक्तदान, धुळ्यात पाटलांच्या लग्नसोहळ्यात सामाजिक बांधिलकी

व्हिडीओ पाहा :

Blood donation by Jitendra Awhad amid shortage of blood during Covid time

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.