राज्यातील मंदिरे कधी उघडणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं पहिल्यांदाच मोठं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मंदिरे उघडण्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहे, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. (cm uddhav thackeray reaction on temple reopening)

राज्यातील मंदिरे कधी उघडणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं पहिल्यांदाच मोठं विधान
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 3:56 PM

कल्याण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मंदिरे उघडण्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहे, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. (cm uddhav thackeray reaction on temple reopening)

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंदिर उघडण्याबाबत भाष्य केलं. आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडत आहोत. त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. धार्मिक स्थळं उघडी राहिली पाहिजेत. ठिक आहे. त्यापेक्षा कपिलजी (केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उद्देशून) तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे ना. की आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचं मंदिर उघडू? असा सवाल करतानाच आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरंही महत्त्वाची आहेत. मंदिरंही उघडणार आहोत. पण एका टप्प्याटप्प्याने आपण जात आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुत्वाचं संरक्षण कसं करायचं हे दाखवून दिलं

आपण घोषणा देताना ‘भारत माता की जय’ म्हणतो. घोषणा दिल्याच पाहिजेत. आम्हीही घोषणा दिल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन आम्ही हिंदुत्वाचं संरक्षण केलं आहे. 1992-93 मध्ये शिवसेनेने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मला त्याच्या खोलात जायचं नाही. पण ‘भारत माता की जय’ बोलल्यानंतर भारत मातेची मुलं आपल्या आरोग्यासाठी तळमळत असतील तर ती भारत माता आपल्याला काय सांगेल? अरे माझा जयघोष काय करता माझ्या बाळांकडे पाहा. त्यांना औषधं द्या सोयी सुविधा द्या, असंच भारत माता सांगेल. केवळ घोषणा दिल्याने ती बरी होणार नाही. त्यांना बरं कसं करायचं ते बघा, असंही ती म्हणेल. त्यामुळे त्या दिशेने आपण पाऊल टाकत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

तर जनता काय अपेक्षा ठेवेल?

कालच सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याची मी विनंती केली आहे. कारण कोरोनाचं संकट दाराशी आहे. त्यामुळे थोडं राजकीय पक्षाने संयमाने वागलं पाहिजे. राजकारण चालत राहील. पण आपण जबाबदारीने वागलं नाही तर कसं होईल? जनता कशी वागेल? जनता आपल्याकडून कशी अपेक्षा ठेवेल? ही जबाबदारी ओळखून सर्वांनी वागलं पाहिजे, असं ते म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीसाठी काय हवं ते सांगा

यावेळी कल्याण-डोंबिवलीच्या बॅकलॉगवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बॅकलॉग किती भरायचा आहे? कल्याण-डोंबिवलीचा बॅकलॉग किती बाकी आहे? कशामुळे बाकी आहे? हे पाहायला हवं. पंतप्रधान हे जनतेचे सेवक आहोत. तर आपणही सेवक आहोत. त्यामुळे आपण प्रत्येक भागाला न्याय देणार आहोत. रवींद्र चव्हाण यांनी आता युतीचे कार्यकर्ते असा उल्लेख केला. जर तुम्ही युतीचे कार्यकर्ते म्हणता तर एकत्र आलं पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला बसा एकत्र, चर्चा करा. कल्याण-डोंबिवलीसाठी काय पाहिजे ते मला सांगा. मी कल्याण डोंबिवलीसाठी जे देता येईल ते मी देत राहणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (cm uddhav thackeray reaction on temple reopening)

संबंधित बातम्या:

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ

‘बेकायदा बांधकामांचं काय तर अधिकृत बांधकामेचेही फूटामागे पैसे घेतले जातात’, मनसे आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

(cm uddhav thackeray reaction on temple reopening)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....