नकली सोन्याचे बिस्किटे विकून नागरिकांना फसविणारा डोंबिवलीतील भामटा गजाआड

फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाने मानपाडा पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याची गठडी वळली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.

नकली सोन्याचे बिस्किटे विकून नागरिकांना फसविणारा डोंबिवलीतील भामटा गजाआड
नकली सोन्याचे बिस्किटे विकून नागरिकांना फसविणारा डोंबिवलीतील भामटा गजाआड

डोंबिवली : नकली बिस्किटे विकून नागरिकांना फसविणाऱ्या डोंबिवलीतील एका भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अश्विनीकुमार शुक्ला असे अटक केलेल्या भामट्याचे नाव असून त्याच्याकडून 9 नकली बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपी अश्विनीकुमारने प्रवासी बनून एका रिक्षा चालकाला नकली सोन्याचे बिस्किट 50 हजार रुपयांना विकले. याप्रकरणी मानपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केले. (Dombivali accuse arrested for selling fake gold biscuits)

अश्विनीकुमार शुक्ला याने सोन्याची बिस्किटे विकण्याच्या नावाखाली आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाने मानपाडा पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याची गठडी वळली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नाशिकमध्ये मैत्रिणी फिरवण्यासाठी 56 सोनसाखळ्या चोरी

आपल्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्यासाठी तब्बल 56 चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी केलेलं सोनं या चोरट्यांकडून विकत घेणाऱ्या दोन सराफांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्ष पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी अखेर जेरबंद केलं. सिनेस्टाईल पाठलाग करून नाशिक पोलिसांनी केलेल्या या दबंग कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दोघा सराफांनाही अटक

चोरीचे सोने घेणाऱ्या दोघा सराफांना अटक करण्यात आली आहे. तुषार बाळासाहेब ढिकले, दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील असे सोनसाखळी चोरांची नावे आहेत. मैत्रिणींना फिरायला नेण्यासाठी तसेच रोलेट खेळण्यासाठी चेन स्नॅचिंग करत असल्याचा धक्कादायक खुलासा इंजिनिअर असलेल्या दोघा चोरांनी केला आहे

तीन वर्षांत या आरोपींकडून अनेक गुन्हे उघड झाले आहेत. अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. यापैकी आडगाव – 2, म्हसरूळ – 3, पंचवटी – 4, सरकारवाडा – 4, मुंबई नाका – 9, भद्रकाली- 4, गंगापूर – 6, अंबड – 7, इंदिरानगर – 10, उपनगर – 7 पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या नऊ जणांच्या टोळीला अटक

दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या नऊ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांनी टोळीतील सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, लाल रंगाचा स्क्रू ड्रायव्हर, दरोडा टाकण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात बार्शी -भूम राज्य मार्गावर काटेगावजवळील एका हॉटेलच्या समोर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तलवार, लाल रंगाचा स्क्रू ड्रायव्हर, दरोडा टाकण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Dombivali accuse arrested for selling fake gold biscuits)

इतर बातम्या

कोल्हापुरात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या, 27 वर्षीय तरुणाला अटक

औरंगाबादः 8 महिने पोलिसांना गुंगारा देणारा पोलिसांच्या जाळ्यात, अल्पवयीन मुलीला फूस लावण्याचे प्रकरण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI