महत्त्वाची बातमी! लोकसभा निवडणूक काळात बँकेच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

केंद्रीय निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणुकीच्या काळात बँकेच्या व्यवहारांवर करडी नजर राहणार आहे. निवडणुकीच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशांचा खर्च केला जातो. पण हे पैसे नेमके येतात कुठून? असा प्रश्न उपस्थित होतो. अखेर याचबाबत निवडणूक आयोगाकडून सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाची बातमी! लोकसभा निवडणूक काळात बँकेच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 8:50 PM

ठाणे | 14 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्सद्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरिता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकाना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक बँकेने त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणे आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे युजर आयडी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जाईल आणि त्या नोडल ऑफिसरने त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकाचे यूजर आयडी तयार करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक शाखेची कॅश मुव्हमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणे अत्यावश्यक आहे. क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्याकडून पकडण्यात आली, तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घेण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती आयोगाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नागेंद्र मंचाळ यांची जिल्हास्तरीय बँक समन्वयक (District Level Bank Coordinator (DLBC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सर्व बँकांनी त्यांच्याकडील समन्वय अधिकारी (Nodal Officer) यांची नियुक्ती करून तसे जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ कळवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सूचित केले आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.