ऑईल चोरण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या खाली पाईप बसवले, स्फोट होताच चोरटे पसार; अंबरनाथ हादरले

बरनाथमध्ये एका आगळ्यावेगळ्या चोरीची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काही चोरट्यांनी ऑईल चोरण्यासाठी ट्रान्सफॉर्मर खाली पाईल लावल्याने स्फोट होऊन भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Fire breaks out in transformer near a factory in Ambernath)

ऑईल चोरण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या खाली पाईप बसवले, स्फोट होताच चोरटे पसार; अंबरनाथ हादरले
transformer

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका आगळ्यावेगळ्या चोरीची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काही चोरट्यांनी ऑईल चोरण्यासाठी ट्रान्सफॉर्मर खाली पाईल लावल्याने स्फोट होऊन भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग अत्यंत भीषण होती. त्यामुळे आजूबाजूचे लोक चांगलेच हादरून गेले होते. तसेच आग लागल्यानंतर हे चोरटे सर्व सामान तिथेच टाकून पळून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Fire breaks out in transformer near a factory in Ambernath)

अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसी परिसरात क्रेमॉइंट नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या बाजूला विद्युत विभागाचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला रात्री 11.30च्या सुमारास अचानक मोठी आग लागली. सोबतच ट्रान्सफॉर्मरमध्ये एक स्फोटसुद्धा झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग पूर्णपणे विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आग विझवल्यानंतर ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता, ही आग ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरताना लागल्याची धक्कादायक बाब समोर आली.

अशी सुरू होती चोरी

ट्रान्सफॉर्मरच्या खालच्या बाजूला ऑईल चोरण्यासाठी प्लास्टिकचे पाईप बसवण्यात आले होते. तसंच ट्रान्सफॉर्मरपासून काही अंतरापर्यंत काही प्लास्टिकचे पाईप टाकून त्याद्वारे ही चोरी केली जात असल्याचं समोर आलं. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी ऑईल चोरी करणारे चोरटे ट्रान्सफॉर्मर जवळच उभे होते. मात्र आग लागताच हे चोरटे तिथून पळून गेले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थानिकांमध्ये धावपळ

रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर अचानक ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याने स्थानिक घाबरले आणि घराबाहेर पडले. घराच्या बाहेर येताच त्यांना ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याचं दिसलं. त्यामुळे रहिवाश्यांनी एकच धावपळ करत ही आग विझवली. मात्र, आग काही अटोक्यात येईना. त्यानंतर अगदी काही वेळात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण आणले.

चोरट्यांना पकडणार

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रत्यक्षदर्शींकडून चोरट्यांची माहिती घेतली. शिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात येणार असून त्या आधारे चोरट्यांना पकडण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय स्थानिकांच्या मागणीनुसार परिसरात पोलिसांची गस्त वाढवली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (Fire breaks out in transformer near a factory in Ambernath)

 

संबंधित बातम्या:

Video : नदीला पूर, गावाला रस्ता नाही, तरुणांची शक्कल, प्रवासाचा ‘मार्ग’ मोकळा!

वसईत बंद फ्लॅट हेरुन घरफोडी, बिहारी टोळीतील सहा जण जेरबंद, चोरीचा माल घेणारा पालघरमध्ये सापडला

आघाडीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, सरकारच्या निषेधार्थ उद्या ठाण्यात जोरदार आंदोलन करणार: डावखरे

(Fire breaks out in transformer near a factory in Ambernath)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI