आघाडीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, सरकारच्या निषेधार्थ उद्या ठाण्यात जोरदार आंदोलन करणार: डावखरे

निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारची पिसे काढली. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. (niranjan davkhare)

आघाडीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, सरकारच्या निषेधार्थ उद्या ठाण्यात जोरदार आंदोलन करणार: डावखरे
niranjan davkhare

ठाणे: राज्यातील आघाडी सरकार ओबीसींचं आरक्षण टिकवू शकलं नाही. या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं सांगतानाच सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात उद्या 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. (niranjan davkhare call protest against maharashtra government in thane)

निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारची पिसे काढली. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. या बाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. त्यावर तरी राज्य सरकारने चिंतन करावे, असा टोला डावखरे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी काहीच केले नाही

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी ठाण्यासह राज्यभरात तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी ओबीसींच्या जागा पूर्वी आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देण्याबाबत भाजपने आधीच भूमिका जाहीर केल्याचंही त्यांनी सांगितलं.

निवडणूक कधी?

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.

15 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करता येणार

पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील, असं त्यांनी सांगितलं. (niranjan davkhare call protest against maharashtra government in thane)

असा आहे निवडणूक कार्यक्रम

15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल

किती जागांसाठी निवडणूक

जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पचंयात समितीच्या 144 जगाा

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभर आंदोलन, एक हजार ठिकाणी निदर्शने; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

राज्य सरकारचीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता?; भुजबळ नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

(niranjan davkhare call protest against maharashtra government in thane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI