उमेदवारी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक, थेट भाजप आमदाराच्या हकालपट्टीची मागणी; कल्याणमध्ये काय घडतंय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याण-डोंबिवली मतदारसंघातूनच लढणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. मात्र, ही उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटाने एक वेगळीच मागणी केली आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवारी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक, थेट भाजप आमदाराच्या हकालपट्टीची मागणी; कल्याणमध्ये काय घडतंय?
ganpat gaikwadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 4:24 PM

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध केलेला असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कल्याणचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यावेळेस शिंदे गटाने गणपत गायकवाड यांच्या हकालपट्टीची मागणी करून भाजपला घेरण्याचं काम केलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

विरोध करणारे गायकवाड समर्थक

शिंदे गटातील युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवार म्हणून अधिकृतरित्या घोषणा केली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत आनंदाचे वातावरण आहे. कल्याण लोकसभेती सुसंस्कृत खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. श्रीकांत शिंदे यांनी या परिसरात विकासाची अनेक कामे केली आहेत. ही कामे मतदारसंघातील नागरिकांनाही माहीत आहे. पण भाजपचे कार्यकर्ते नाहक श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत. विरोध करणारे हे सर्व कार्यकर्ते गणपत गायकवाड यांचे समर्थक आहेत, असा आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

तेच योग्य राहील

जे गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांना सॉफ्ट कॉर्नर मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप अशा गुंड प्रवृत्तीला कधीच पाठिशी घालणार नाही. त्यांच्यावर कारवाई करतील. भाजपने गणपत गायकवाड यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी केली पाहिजे. अशा गुंड प्रवृत्तीला पक्षात ठेवणं योग्य नाही. त्यांची हकापट्टी करणं हेच युतीसाठी योग्य राहील, असं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

श्रीकांत शिंदे यांचा सवाल

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. पण आमदार गणपत गायकवाड यांच्यावर बोलण्यास नकार दिला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा काय पर्सनल अजेंडा असेल तो मला माहीत नाही. पक्षाचं नाव घेऊन हे लोक युतीचं नाव खराब करत असतील. गुंड प्रवृत्तीचे हे लोक असं कशासाठी वागत आहेत? त्यांचा काय पर्सनल अजेंडा आहे? असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.