‘फ्रिडम सायक्लोथॉन’ला ठाणेकरांची पाठ, पहिल्याच रॅलीला अल्प प्रतिसाद

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिकेने आज फ्रिडम सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. प्रदूषण टाळण्यासाठी आणि वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. (Hundreds take part in Thane corporation cyclothon)

'फ्रिडम सायक्लोथॉन'ला ठाणेकरांची पाठ, पहिल्याच रॅलीला अल्प प्रतिसाद
cyclothon
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 10:56 AM

ठाणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिकेने आज फ्रिडम सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. प्रदूषण टाळण्यासाठी आणि वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, ठाणेकरांनी या रॅलीकडे पाठ फिरवल्याने रॅलीला अल्प प्रतिसाद मिळाला. (Hundreds take part in Thane corporation cyclothon)

ठाणे महानगरपालिकेने आज फ्रिडम सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. या सायकल रॅलीचे उद्घाटन महापालिका मुख्यालय व हिरानंदानी मेडोज येथे करण्यात आले. पहिल्यांदाच हा उपक्रम पालिकेच्या वतीने राबवण्यात आला होता. मात्र ज्या पटीने सायकलस्वार या रॅलीत सहभागी येणं अपेक्षित होतं, त्या प्रमाणात सायकलस्वार आले नाहीत. मात्र, तरीही आहे त्या सायकलस्वारांना घेऊन रॅली काढण्यात आली.

75 किमीचा प्रवास

ठाणे महापालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडिया आणि परत ठाणे या मार्गावर ही रॅली काढण्याता आली. फ्रि रॅली सायकल टू वर्क हिरानंदानी मेडोस येथून मुलुंड परत ठाणे हिरानंदानी मेडोसपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 75 किलोमीटरचा या सायक्लोथॉनचा प्रवास होता. त्यासाठी पालिकेचे अधिकारी, खासदार आणि नगरसेवक सकाळीच ठाणे महापालिका येथे जमले होते.

सायकलचा वापर करा

दरम्यान, सायकलच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळा सायकल ट्रॅक देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सायकलप्रेमींनी खासदार राजन विचारे आणि महापालिकेकडे ही मागणी केली आहे. तसेच छोट्या छोट्या कारणांसाठी घराबाहेर पडताना अनेक जण मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा वापर सर्रास करताना दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यासाठी भविष्यात सायकलचा प्रवासासाठी वापर केल्यास इंधन बचत होईल आणि प्रदूषणही टळेल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल, असं राजन विचारे यांनी सांगितलं.

सायकल ट्रॅक निर्माण करणार

तर, सायकल ट्रॅकसाठी पालिकेने देखील प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी खासदार राजन विचारे, उप महापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सेना नगरसेविका नंदिनी विचारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

चार अभियंते निलंबित

दरम्यान, ठाण्यातील खड्ड्यांप्रकरणी चार अभियंते निलंबित करण्यात आले आहेत. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.

खड्डे लवकर बुजवणार

दरम्यान, पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शहरातील पाच उड्डाणपुलावरील रस्ते नीट आहेत. मात्र, काही रस्त्यांची डागडुजी होणे बाकी आहे. मात्र, रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करू नका. अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर करवाई करा, असं सांगतानाच शहरातील परिस्थिती लक्षात घेऊनच फाऊंटन आणि जेएनपीटीकडील वाहने सोडावी लागणार आहे, असं ते म्हणाले होते. शहरातील रस्त्यांची कामे आम्ही युद्धपातळीवर हाती घेतली आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवले जाणार आहेत. पाऊस ओसरला की रस्त्याची कामे जोमाने सुरू करणार आहोत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. वाहतूक कोंडीमागे केवळ खड्डे हे एकमेव कारण नाही. तर मोठी अवजड वाहने, जेएनपीटीतील अवजड वाहने आदींमुळेही वाहतूक कोंडी होत आहे, असं शिंदे यांनी सांगितलं होतं. (Hundreds take part in Thane corporation cyclothon)

संबंधित बातम्या:

16 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन पोलिसांना महिनाभर चकवा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून नराधमाला बेड्या

‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या

अरे बापरे! ठाण्यात सूजर वॉटर पार्कमध्ये आढळली 7 फूट लांब मगर; कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली

(Hundreds take part in Thane corporation cyclothon)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.