AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : डोंबिवलीत 24 कोटींचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न, टोळी गजाआड, आतापर्यंत 10 कोटींचा गंडा

बनावट चेक तयार करुन आतापर्यंत देशभरात 10 कोटीचा गंडा घालणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करीत त्यांच्या म्होरक्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुजरातहून बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीमध्ये अजून किती लोक आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत एकूण नऊ लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Dombivali Crime : डोंबिवलीत 24 कोटींचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न, टोळी गजाआड, आतापर्यंत 10 कोटींचा गंडा
डोंबिवलीत 24 कोटींचा बनावटी चेक वटविण्याचा प्रयत्न, टोळी गजाआड
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 5:56 PM
Share

डोंबिवली : डोंबिवलीतील बनावट चेक(Fake Check) प्रकरणी पोलिससांनी आज मुख्य सूत्रधारासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत 10 कोटींचा गंडा घातला आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2021 रोजी डोंबिवली पूर्व भागातील एचडीएफसी बँके(HDFC Bank)च्या शाखेत तीन जण एक बनावट चेक घेऊन गेले होते. यातील एकाने आपण सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष असून आपल्या संस्थेला इंडोस टॉवर लिमिटेड या मोबाईल टॉवर कंपनीकडून 24 कोटी रुपये देणगी मिळाली आहे असे सांगितले. यानंतर बँकेतील क्लर्कने बँक मॅनेजरला या चेकची माहिती दिली. मॅनेजरने सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता या तिघांच्या संशयास्पद वाटल्या. मॅनेजरने डोंबिवली मानपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ बँकेत हजर होत या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ही फसवणुकीची घटना समोर आली. (In Dombivali, Manpada police arrested Gang for fake checks)

आतापर्यंत 10 कोटींचा गंडा घातला

बनावट चेक तयार करुन आतापर्यंत देशभरात 10 कोटीचा गंडा घालणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करीत त्यांच्या म्होरक्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुजरातहून बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीमध्ये अजून किती लोक आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत एकूण नऊ लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बँकेत आलेल्या तिघांपैकी एक जण हरिचंद्र कडवे याने आपण वांगणीतील संत रोहिदास सेवा संस्थेचा अध्यक्ष असल्याची बतावणी केली होती. मात्र मॅनेजरला संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी अन्य पाच जणांना अटक केली.

ढोलकिया सांगण्यावरुन बनावट चेक बनवला होता

अटक केलेल्या आठ जणांना समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी केली असता बनावट चेक कसा मिळवला याची माहिती पोलिसांनी मिळाली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन साळसकर नामक कॉम्प्युटर मॅकेनिक आहे. या टोळीचा म्होरक्या भावेश ढोलकिया याच्या सांगण्यावरुन साळसकर कोणत्याही बँकेचा बनावट चेक तयार करीत होता. असाच 24 कोटीचा चेक त्याने इंडोस कंपनीच्या चेक व्यवहार बघणाऱ्या व्यक्तीच्या स्वाक्षरीचा बनवला होता. टोळीचा म्होरक्या भावेश ढोलकिया हा याआधीही अशाच एका प्रकरणात जेलमध्ये होता. या टोळीने तामिळनाडू, गुजरात कर्नाटक महाराष्ट्र यासह अन्य राज्यातही अशी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे, असे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी सांगितले. मानपाडा पोलीस सखोल तपास करीत आहेत. (In Dombivali, Manpada police arrested Gang for fake checks)

इतर बातम्या

Pune Crime | सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! आंबेगावमध्ये ऊसाने भरलेली ट्राली अंगावर कोसळल्याने जागीच मृत्यू

Nashik | थकबाकीपोटी वीज तोडली, पठ्ठ्यांनी आकडे टाकले, 9 जणांवर महावितरणची काय कारवाई?

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.