मुंब्य्रात महिला व लहान मुलांसाठी 34 बेडचे रुग्णालय; मंत्री जितेंद्र आव्हाड, अभिनेत्री इशा कोप्पीकर यांच्या हस्ते उद्घाटन

क्वीन केअर क्लिनिक या सुसज्ज रुग्णालयाची विविध वैशिष्ट्ये आहेत. याच वैशिष्ट्यांच्या जोरावर हे रुग्णालय मुंब्रावासियांना अत्याधुनिक उपचार पुरवू शकणार आहे. या रुग्णालयात अवघ्या अर्धा किलो वजनाच्या प्री-मॅच्युअर बाळावर देखील येथे उपचार केले जाऊ शकतात.

मुंब्य्रात महिला व लहान मुलांसाठी 34 बेडचे रुग्णालय; मंत्री जितेंद्र आव्हाड, अभिनेत्री इशा कोप्पीकर यांच्या हस्ते उद्घाटन
मुंब्य्रात महिला व लहान मुलांसाठी 34 बेडचे रुग्णालय

ठाणे : मुंब्रा, शीळफाटा आणि कौसा परिसरातील महिला आणि लहान मुलांसाठी 34 बेडचे सुसज्ज खासगी रुग्णालय सुरू झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि सिने अभिनेत्री इशा कोप्पीकर यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. क्वीन केअर क्लिनिक असे या रुग्णालयाचे नाव असून शीळफाटा येथील दत्तमंदिराजवळ हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. चांगली आरोग्यसेवा देणे हे काळाची गरज आहे. मुंब्रा भागात महिला व लहान मुलांसाठी 34 बेडचे खाजगी रुग्णालय उघडले आहे, याचा आनंद होत असल्याची भावना गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केली. (Jitendra Awhad, Actress Isha Koppikar Inaugurates Hospital for Women and Children in Mumbra)

अभिनेत्री इशा कोप्पीकर यांनी हे रुग्णालय या भागातील सुसज्ज रुग्णालय असून रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला परवडणारा असेल, अशी इच्छा व्यक्त केली. भारतात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आहेत. त्यामुळे महिला आणि मुलांसाठी अशा प्रकारची अनेक सुसज्ज रुग्णालय उभारणे ही काळाची गरज असल्याचे इशा कोप्पीकर हिने सांगितले. तसेच त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

रुग्णालयाची विविध वैशिष्ट्ये

क्वीन केअर क्लिनिक या सुसज्ज रुग्णालयाची विविध वैशिष्ट्ये आहेत. याच वैशिष्ट्यांच्या जोरावर हे रुग्णालय मुंब्रावासियांना अत्याधुनिक उपचार पुरवू शकणार आहे. या रुग्णालयात अवघ्या अर्धा किलो वजनाच्या प्री-मॅच्युअर बाळावर देखील येथे उपचार केले जाऊ शकतात. अशाप्रकारे विविध वैशिष्ट्यांनी सुसज्ज रुग्णालय सुरू झाल्यामुळे मुंब्रा परिसरातील महिला व लहान मुलांच्या वैद्यकीय उपचारांची गैरसोय दूर होणार आहे. मुंब्रा, कौसा, शीळफाटा आणि दिवा परिसरात सर्वसामान्य आणि चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. परंतु या भागात महिला आणि लहान मुलांसाठी सुसज्ज रुग्णालयाची कमतरता होती. या रुग्णालयाच्या उद्घाटनामुळे ती कमतरता दूर झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांना टोला

रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी आव्हाड यांना गोपीचंद पडळकर यांच्याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी पडळकर यांना जोरदार टोला लगावला. बातम्यांमध्ये चर्चेत राहणे हा ज्यांचा उद्योग असतो, ते लोक कुठलेही विधान करतात, अशा शब्दांत त्यांनी गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच वृत्तवाहिनीवाले हौशी आहेत, ज्या विधानाला अर्थ नसतो, तेच ते जास्त दाखवतात, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबद्दलही भाष्य केले. गडकरींनी सहकार्याच्या अपेक्षेने पत्र लिहिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Jitendra Awhad, Actress Isha Koppikar Inaugurates Hospital for Women and Children in Mumbra)

इतर बातम्या

रत्नागिरीमध्ये चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग, मुंबई एटीएसला सुगावा लागताच दोघांना बेड्या

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI