AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला पत्रकाराला शिवीगाळ, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना पुन्हा मोठा धक्का

वामन म्हात्रे यांच्यावर महिला पत्रकाराला अपशब्द आणि जातीवाचक बोलण्याचा आरोप आहे. त्यामुळे वामन म्हात्रे यांच्याविरोधात बदलापूर येथे विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्ट पाठोपाठ आता कल्याण कोर्टानेही वामन म्हात्रे यांना झटका दिला आहे.

महिला पत्रकाराला शिवीगाळ, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना पुन्हा मोठा धक्का
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना पुन्हा मोठा धक्का
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 29, 2024 | 7:23 PM
Share

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्ट पाठोपाठ आता कल्याण कोर्टानेदेखील धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार वामन म्हात्रे यांनी कल्याण कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कल्याण न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला मोटे यांनी वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला. हा वामन म्हात्रे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. अटकपूर्व जामीन मंजूर न झाल्याने वामन म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे पोलीस वामन म्हात्रे यांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करु शकतात.

वामन म्हात्रे यांच्यावर महिला पत्रकाराला अपशब्द आणि जातीवाचक बोलण्याचा आरोप आहे. त्यामुळे वामन म्हात्रे यांच्याविरोधात बदलापूर येथे विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आपल्याला अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी वामन म्हात्रे यांनी कल्याण कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांना कल्याण कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत, या प्रकरणी कल्याण कोर्टाने निर्णय घ्यावा, असा आदेश कल्याण कोर्टाला दिले. यानंतर या प्रकरणी आज कल्याण कोर्टात सुनावणी पार पडली.

कोर्टात आज नेमकं काय घडलं?

वामन म्हात्रे यांच्याकडून वकील दर्शन सावंत यांनी युक्तिवाद केला. तर पीडित मोहिनी जाधव यांच्याकडून भूषण बेंद्रे यांनी युक्तिवाद केला. यावेळी कायद्याचा धाक राहिला पाहिजे, अशी मागणी करत वामन म्हात्रे यांची याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. कल्याण न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला मोटे यांनी संबंधित युक्तिवाद ग्राह्य धरत वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच