3 महिन्यात 20 हजार बांधकामे कसे पाडणार? निवडणुकीचा टार्गेट तर पूर्ण करायचा नाही ना?; आमदार राजू पाटलांचा सवाल

3 महिन्यात 20 हजार बांधकामे कसे पाडणार? निवडणुकीचा टार्गेट तर पूर्ण करायचा नाही ना?; आमदार राजू पाटलांचा सवाल
raju patil

कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील सुमारे 20 हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यात ही कारवाई पूर्ण करायची असून पुढच्या आठवड्यापासून कारवाईला सुरुवात होणार आहे.

अमजद खान

| Edited By: भीमराव गवळी

Dec 17, 2021 | 7:38 PM

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील सुमारे 20 हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यात ही कारवाई पूर्ण करायची असून पुढच्या आठवड्यापासून कारवाईला सुरुवात होणार आहे. पालिकेच्या या निर्णयावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सवाल केला आहे. तीन महिन्यात तीन हजार बांधकामे कसे पाडणार? निवडणुकीचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना? असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे.

राजू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. केडीएमसी प्रशासनाने येणाऱ्या तीन महिन्यात 20 हजार अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयावर टीका केली. हा निर्णय लक्ष विचलित करण्यासाठी घेण्यात आल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता. आता मनसे आमदार राजू पाटील यानी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे. मात्र गेल्या वर्षभर प्रशासकीय राजवट आहे. या काळात किती अनधिकृत बांधकाम झाली याच ऑडिट झालं पाहिजे. जी बांधकामे झाली त्या संबंधित अधिकारी व बिल्डरांवर कारवाई का केली नाही? असा सवाल पाटील यांनी केला.

त्या गावांची बांधकामे कशी घेता?

आता येत्या 3 महिन्यात 20 हजार बांधकाम तोडण्याची घोषणा केली हे शक्य आहे का? निवडणूक जवळ आली आहे म्हणून काही टार्गेट देण्यात आले आहे का? या टार्गेटसाठी हे सर्व केलं जातंय का? असा सवालही आमदार पाटील यांनी केला.  27 गावांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या गावांमध्ये भूमीपुत्रांच्या जमिनीवर अतिरिक्त आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यासाठी ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावीत, अशी संघर्ष समितीची मागणी आहेय याकडे दुर्लक्ष करून या गावांमधील बांधकाम कसे घेतो घेऊ शकतात? असा सवालही त्यांनी केला.

निधीची पळवापळवी सुरू आहे

इतकंच नाही तर शिवसेना-भाजपमध्ये निधी गायब केल्याचा वाद सुरू आहे. त्या वादावरूनही त्यांनी दोन्ही पक्षांना टोले लगावले. हे वाद दाखवण्यासाठी आहेत. हे फक्त राजकारण आहे. ज्याची सत्ता असते ते पळवापळवीची काम करत असतात. निधी असो की लोकप्रतिनिधी असो दोन्ही पळवले जातात, असं सांगतानाच या दोन्ही पक्षांनी शहराची वाट लावली आहे. लक्ष विचलित करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.

संबंधित बातम्या:

Sindhudurg : आगामी नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल- नारायण राणे

भुसावळमध्ये भाजपला भगदाड, 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाथाभाऊंच प्रचंड शक्तीप्रदर्शन

MSRTC Strike: 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा नाही?; अनिल परब नेमकं काय म्हणाले?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें