शहर स्वच्छ करण्यासाठी लोक कष्ट करीत आहेत, नागरिकांनी देखील सहकार्य करावे; पालिका आयुक्तांचे आवाहन

शहर स्वच्छ करण्यासाठी लोक कष्ट करीत आहेत, नागरिकांनी देखील सहकार्य करावे; पालिका आयुक्तांचे आवाहन
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Image Credit source: टीव्ही 9

कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून ओला सुका कचरा वर्गीकरण, बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, प्लास्टिक बंदी सुरू केली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या मधील दुभाजक आणि भिंती रंगकाम आणि आकर्षक चित्रे रेखाटून सुशोभित करण्यात आल्या आहेत. अस्वच्छ शहराचा शिक्का पुसून काढण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असताना अनेक नागरिक या भिंतीवर आणि दुभाजकावर थुंकून रस्त्यावर कचरा टाकत घाण करत ते खराब करत असल्याने पालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 31, 2022 | 8:18 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात स्वच्छ भारत अभियान (Swachcha Bharat Abhiyan) जोरात राबविले जात आहे. रस्ते शौचालय, मैदाने, उद्यानात दररोज सफाई केली जात आहे. महापालिकेकडून दुभाजक आणि भिंती रंगवून सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न आहे. या दुभाजक आणि भिंतीवर नागरिक थुंकून खराब करतात अशी खंत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांनी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर शहराला स्वच्छ करण्यासाठी लोक कष्ट घेत आहेत. हे शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी ही सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले. (Municipal Commissioner appeals to citizens to support Swachh Bharat Abhiyan in Kalyan Dombivali city)

यंदा टॉप 10 मध्ये येण्याचा महापालिकेचा मानस

कल्याण डोंबिवली शहराने घाणेरडे शहरातील 1 नंबरच्या शहरापासून वाटचाल सुरु करत मागील वर्षी स्वच्छ शहराच्या यादीत 22 वे स्थान पटकावले होते. यंदा प्रशासनाने स्वच्छ शहराच्या यादीत पहिल्या 10 मध्ये येण्याचे उद्दिष्ट ठेवत स्वच्छतेवर भर दिला आहे. दररोज रस्त्यावरील स्वच्छता करतानाच छोट्या नाल्याची सफाई दररोज केली जात असून सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर देखील विशेष लक्ष दिले जात आहे. तर उद्याने, मैदाने आणि स्मशानभूमी देखील पहाटेपासून सकाळपर्यंत स्वच्छ केल्या जात आहेत.आयुक्त स्वतः स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांनी शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सहकार्य करावे

कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून ओला सुका कचरा वर्गीकरण, बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, प्लास्टिक बंदी सुरू केली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या मधील दुभाजक आणि भिंती रंगकाम आणि आकर्षक चित्रे रेखाटून सुशोभित करण्यात आल्या आहेत. अस्वच्छ शहराचा शिक्का पुसून काढण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असताना अनेक नागरिक या भिंतीवर आणि दुभाजकावर थुंकून रस्त्यावर कचरा टाकत घाण करत ते खराब करत असल्याने पालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक लोक कष्ट करत असून नागरिकांनी देखील शहर स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे हे ओळखून स्वच्छतेच्या कामात सहभाग घ्यावा. शहरात थुंकून घाण करणे टाळावे, घाण करणाऱ्याला वेळीच रोखून शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (Municipal Commissioner appeals to citizens to support Swachh Bharat Abhiyan in Kalyan Dombivali city)

इतर बातम्या

Rajesh Tope on Mumbai Local : राज्यातील निर्बंध उठवले, पण Local निर्बंधांचं काय? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं!

Video : अंबरनाथमध्ये चोराचं कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा, चोरीची स्टाईल बघून कपाळावर हात माराल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें