इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं बैलगाडी आंदोलन, महिलांनी चुली पेटवल्या, तरुणांची सायकल रॅली

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आक्रमक भूमिका घेत, चूल पेटवून, बैलगाडी आणि सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला. (NCP’s bullock cart Protest […]

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं बैलगाडी आंदोलन, महिलांनी चुली पेटवल्या, तरुणांची सायकल रॅली
NCP Protest in Thane against fuel price hike
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 5:37 PM

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आक्रमक भूमिका घेत, चूल पेटवून, बैलगाडी आणि सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला. (NCP’s bullock cart Protest against fuel price hike, women light stoves, youth organize cycle rally)

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. या दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी, ‘मोदी फेकतो डोळ्यात धूळ, रिकामे सिलिंडर पेटते चूल’, ‘तेल का खेल, मोदी सरकार फेल’, ‘भाजप की नियत झुटी है, महंगाई फिर से लौटी है’, ‘सिलिंडर हुआ 800 पार, कहाँ हो मोदी सरकार’, ‘हर रोज किंमत बढाओगे, अच्छे दिन कब लाओगे’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. तर महिलांनी या ठिकाणी चूल पेटवून भाकऱ्या भाजल्या. काही कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे घालून रिकामा सिलिंडर उचलून तर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बैलगाडी हाकून केंद्र सरकारचा निषेध केला.

यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, गेल्या महिनाभरात 790 रुपये असणारा सिलिंडर 834.50 रुपये एवढा महाग झाला आहे. याचा महिलांनी निषेध चूल पेटवून केला आहे. ठाण्यात सध्या पेट्रोलचा दर 105 रुपये झाला आहे. त्यामुळे युवक आणि युवतींनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला, बैलगाडी चालवून आता कार पेक्षा बैलगाड्याच चालवाव्या लागतील, असा संदेश देत केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनातून मोदी सरकारचा निषेध केला आहे. मोदी सरकार हे सामान्यांना लुटण्यासाठी आहे. एकीकडे कोरोनाची महामारी असताना, बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळेच आम्ही मोदी सरकारचा निषेध करीत आहोत. जनतेच्या मनातील रोष ओळखून आता तरी मोदी सरकारने इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करीत जर इंधनाचे दर कमी केले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्यात 

Video: लसीकरण केंद्रावर चालूपणा, संतापलेल्या राजन विचारेंनी शिवसैनिकाला मारला फटका, व्हिडीओ व्हायरल

VIDEO | कल्याणमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल

कोरोना लस घेण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकेची दुचाकी खड्ड्यात अडकली, उपचारादरम्यान मृत्यू

(NCP’s bullock cart Protest against fuel price hike, women light stoves, youth organize cycle rally)

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.