अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पतीवर दबाव, मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या, मृत्यूचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश

अविनाश यांच्या पत्नी डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध आपल्या पतीने मान्य करावे यासाठी डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या. तसेच यावरुन त्यांचा मानसिक छळही करीत होत्या.

अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पतीवर दबाव, मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या, मृत्यूचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश
अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पतीवर दबाव, मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या

टिटवाळा : डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यास टिटवाळा पोलिसांना यश आले आहे. अविनाश देशमुख(32) या डॉक्टरने 12 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी केली होती. या प्रकरणी टिटवाळा पोलिसात आत्महत्येची नोंद करीत पुढील तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी या आत्महत्येमागील धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या अनैतिक संबंधांना मान्यता द्यावी म्हणून पत्नी आणि तिची आई डॉक्टरवर मानसिक दबाव आणत होत्या. याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अनैतिक संबंध मान्य करण्यासाठी पत्नी आणि सासूचा दबाव

टिटवाळा पूर्वेला नारायण रोड परिसरात मोहन हाईट्स या इमारतीत डॉ. अविनाश देशमुख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अविनाश यांची पत्नीही डॉक्टर आहे. अविनाश हे इंदिरा नगर परिसरात आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होते. अविनाश यांच्या पत्नी डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध आपल्या पतीने मान्य करावे यासाठी डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या. तसेच यावरुन त्यांचा मानसिक छळही करीत होत्या. याशिवाय सासू-सासऱ्यांसोबत रहायचे नाही, त्यामुळे वेगळे घर घे, असा तगादाही शुभांगी हिने पतीकडे लावला होता. या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. अविनाश देशमुख यांनी राहत्या घरातील बेडरुममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला दिली माहिती

डॉ. अविनाश यांच्या आत्महत्येसमयी त्यांची पत्नी आपल्या माहेरी साताऱ्याला गेली होती. आत्महत्या करण्यापूर्वी अविनाश यांनी आपल्या पत्नीला याबाबत माहिती दिली. पत्नीने तिच्या आईला याबाबत सांगितले. आईने त्याच परिसरातच राहत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कळविले. मात्र त्यांचे कुटुंबिय घरी पोहचण्याआधीच अविनाश यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी डॉक्टरच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पत्नी आणि सासू यांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनी मानसिक त्रास दिल्यानेच डॉ. अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. डॉ. शुभांगी देशमुख आणि संगीता मोरे अशी आरोपींची नावे आहेत. या दोघींविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police reveal doctor’s suicide case in Titwala)

इतर बातम्या

जळगावमध्ये पैशासाठी पोलिसानेच घडवली कापूस व्यापाऱ्याची हत्या, शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने रचला कट

पिंपरीत लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका, छाप्यात सापडली कंडोमची पाकिटं

Published On - 5:22 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI