AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Bee Attack : यवतमाळमध्ये मधमाशांच्या हल्यात उपसरपंचाचा मृत्यू; येडशी येथील धक्कादायक घटना

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटंबनपासून 6 किमी अंतरावर असलेल्या येडशी गावाच्या उपसरपंचावर मधमाशांनी हल्ला केला. अपना देशी बार समोरील झाडा जवळून दुचाकीने जात असताना झाडावर बसलेल्या मधमाशांनी नगराळे यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

Yavatmal Bee Attack : यवतमाळमध्ये मधमाशांच्या हल्यात उपसरपंचाचा मृत्यू; येडशी येथील धक्कादायक घटना
यवतमाळमध्ये मधमाशांच्या हल्यात उपसरपंचाचा मृत्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 9:37 PM
Share

यवतमाळ : मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळमधील झरी तालुक्यात घडली आहे. भोला महादेव नगराळे असे मधमाशां (Honey Bee)च्या हल्ल्यात ठार झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. विशेष म्हणजे काल येडशी या गावातील सोसायटीचा निकाल हाती आला. त्यात मृतक भोला नगराळेंच्या आई विमल बाई विजयी झाल्या. विजयोत्सव साजरा करून काही तास उलटत नाहीत तोवर भोलावर काळाने झडप घातल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसात मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली आदि ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. (One person was death in a bee attack in Yavatmal)

रस्त्यावरुन जात असताना झाडावरील मधमाशांचा हल्ला

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटंबनपासून 6 किमी अंतरावर असलेल्या येडशी गावाच्या उपसरपंचावर मधमाशांनी हल्ला केला. अपना देशी बार समोरील झाडा जवळून दुचाकीने जात असताना झाडावर बसलेल्या मधमाशांनी नगराळे यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर काही नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी नगराळेंना उपचारासाठी मुकुटबन आणि वणी येथील रूग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. यामुळे नगराळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी

कोल्हापूरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त जमलेल्या भाविकांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 50 हून अधिक भाविक जखमी झाले होते. सांगलीत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त जमलेल्या जमलेल्या भाविकांना मधमाशांनी चावा घेतल्याने अनेक लोक जखमी झाले. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर झालेल्या पळापळीत महिला 100 खोल दरीत फूट दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानं महिलेच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सातारा शहरालगत असणाऱ्या शेरेवाडी या ठिकाणच्या शिलोबाच्या डोंगरावर यात्रेनिमित्त गेलेल्या युवकाचा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात डोंगरावरून दरीत कोसळून मृत्यू झाला. (One person was death in a bee attack in Yavatmal)

इतर बातम्या

Chandrapur Crime : चोरांनी चक्क सुरक्षा रक्षकाची बंदूकच पळवली, बँक ऑफ इंडियाची शाखाही फोडली

Badlapur Murder : बदलापुरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.