Kalyan Literary Conference : कल्याणमध्ये सातव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन; परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलनाची रेलचेल

येत्या 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिमेकडील बुद्धभूमी फाऊंडेशन, वालधुनी येथे हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. संविधान सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव हे संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत. प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या साहित्य संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद आणि कविसंमेलन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

Kalyan Literary Conference : कल्याणमध्ये सातव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन; परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलनाची रेलचेल
कल्याणमध्ये सातव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 10:23 PM

कल्याण : कल्याणमध्ये विकास प्रबोधिनी आणि बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने सातव्या आंबेडकरी साहित्य संमेलना (Ambedkar Literary Conference)चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिमेकडील बुद्धभूमी फाऊंडेशन, वालधुनी येथे हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. संविधान सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव हे संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत. प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या साहित्य संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद आणि कविसंमेलन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी भव्य साहित्य रॅली (Literary Rally) काढण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्षांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्षांचे अध्यक्षीय भाषणही पार पडणार आहे. (Organizing 7th Ambedkar Literary Conference in Kalyan)

शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता पहिल सत्रं सुरू होईल. पहिल्या सत्रात संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. दुसऱ्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित अर्थव्यवस्था’ या विषयावर परिसंवाद होईल. प्रा. डॉ. देवराव मनवर यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडेल. त्यानंतर डॉ. धर्माजी खरात यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवीन शैक्षणिक धोरणाचा समाज मनावर होणारा परिणाम’ हा परिसंवाद पार पडेल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता खुले कविसंमेलन पार पडेल.

‘आंबेडकरवादी साहित्याची गती आणि स्थिती’ या विषयावर परिसंवाद

रविवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पहिल्या सत्राला सुरुवात होईल. पहिल्या सत्राची सुरुवात बी. अनिल ऊर्फ अनिल भालेराव यांच्या कथेच्या अभिवाचनाने होणार आहे. विशाखा सोमकुंवर आणि प्रियांका कासारे हे बी. अनिल यांच्या कथांचे अभिवाचन करतील. त्यानंतर ‘आंबेडकरवादी साहित्याची गती आणि स्थिती’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. प्रकाश खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात अरविंद सुरवाडे आणि डॉ. बी. रंगराव सहभागी होतील. दुपारनंतर ‘शुद्रपूर्वी कोण होते?’ या ग्रंथावर चर्चासत्र होणार आहे. नंतर प्रा. विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात ‘भारतीय संविधानावर धर्मांधतेचे आव्हान’ या विषयावर मंथन होणार आहे. या चर्चा सत्रात भीमराव वैद्य, समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष हंसराज शेंडे आणि ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे सहभागी होणार आहेत. संतोष वैद्य या परिसंवादाचे आभार मानतील.

कवि संमेलनाचे आयोजन

या परिसंवादानतंर विजय सुरवाडे, डी. एल. कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गावंडे करतील तर शामराव सोमकुंवर आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडेल. डॉ. साहेबारव ढाणके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कविसंमेलनात रमेशचंद्र कांबळे, बी. अनिल, यू. एफ. जानराव, सुभाष आढाव, किशोर कासारे, छाया कोरगावकर, डॉ. चंद्रशेखर भारती, भीमराव गवळी, श्याम बैसाणे, सुरेखा गायकवाड, प्रसेनजित खंडारे, हर्षल शाक्य, डॉ. अनिल साबळे, भागवत बनसोडे, भटू जगदेव, गजानन गावंडे आणि भास्कर अमृतसागर सहभागी होतील. या संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम भगत करतील. (Organizing 7th Ambedkar Literary Conference in Kalyan)

इतर बातम्या

Kalyan Shivsena : टिका करणाऱ्यांकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, भाजप आमदारांच्या टिकेवर शिवसेनेचा पलटवार

Kalyan Crime : टिटवाळ्यात जागेच्या वादातून प्राणघातक हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.