नव्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांना होणार चार फायदे, आजपासून 36 नव्या लोकल सुरू करणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

ठाणे आणि दिवा स्थानका दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका निर्माण करण्यात आल्याने मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल. यामुळे मुंबईकराचं इज ऑफ लिव्हिंग वाढेल. मुंबईच्या कधी न थांबणाऱ्या जीवनाला अधिक वेग येईल.

नव्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांना होणार चार फायदे, आजपासून 36 नव्या लोकल सुरू करणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
PM narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 6:10 PM

ठाणे: ठाणे आणि दिवा स्थानका दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका निर्माण करण्यात आल्याने मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल. यामुळे मुंबईकराचं (mumbai) इज ऑफ लिव्हिंग वाढेल. मुंबईच्या कधी न थांबणाऱ्या जीवनाला अधिक वेग येईल. या दोन्ही लाईन्स सुरु होण्यामुळे मुंबईकरांना थेट चार फायदे होणार आहेत. एक म्हणजे लोकल एक्सप्रेस ट्रेनसाठी वेगवेगळी लाईन असेल. दुसरं म्हणजे दुसऱ्या राज्यातील येणाऱ्या ट्रेनला लोकलच्या पासिंगचा वाट पाहावी लागणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याण ते कुर्ला सेक्शनला मेल एक्सप्रेस कोणत्याही अडथळ्या शिवायच चालेल. तसेच चौथी गोष्ट म्हणजे कळवा आणि मुंब्र्यातील लोकांचा मेगा ब्लॉकचा त्रास कमी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सांगितलं. तसेच आजपासून मध्य रेल्वेवर (central railway) 36 नव्या लोकल सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे ते दिवा स्थानका दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण होत आहे ही आनंदाची बाब आहे, असं मोदी म्हणाले. आजपासून मध्यरेल्वेवर 36 नव्या लोकल सुरू होणार आहेत. त्यात एसी ट्रेनचा समावेश आहे. पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू होत आहे हा केंद्र सरकारच्या वचनाचा हा परिपाक आहे. मुंबईत गेल्या सात वर्षात मेट्रोचाही विस्तार झाला आहे. उपनगरात मेट्रोचा विस्तार होत आहे, असं मोदींनी सांगितलं.

आत्मनिर्भर भारतासाठी मुंबईची साथ हवी

लोकलचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची मागणी जुनीच होती. 2008मध्ये पाचव्या आणि सहाव्या लाईनचा शिलान्यास झाला. 2015मध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हायचा होता. पण 2014 पर्यंत हा प्रकल्प रखडला होता. पण आम्ही आल्यावर हा प्रकल्प वेगाने सुरू केला. 34 ठिकाणी नव्या रेल्वेलाईनला जुन्या रेल्वे लाईनने जोडायचं होतं. या सर्व अडथळ्यांवर मात करत पण आपण हा प्रकल्प पूर्ण केला. पूल बनवले. भुयार बनवले. त्यासाठी आपले इंजीनियर आणि कर्मचारी राबले. राष्ट्र निर्माण करण्यासाठी अशा कमिटमेंटला मी नमन करतो. मुंबई महानगरात स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं आहे. आता आत्मनिर्भर भारतातही मुंबईचं सामर्थ मिळेल, असं ते म्हणाले.

मुंबई- अहमदाबाद रेल्वेची गरज

रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली जात आहे. रेल्वेचं आधुनिकीकरण केलं जात आहे. मुंबई उपनगर रेल्वेची क्षमता वाढवायची आहे. 400 किलोमीटरचा विस्तार करायचा आहे. 19 स्टेशनांचं आधुनिककरण करणार आहोत. मुंबईतच नव्हे तर इतर राज्याशीही मुंबईच्या कनेक्टिव्हिटीत स्पीड आणि आधुनिकतेची गरज आहे. सध्या मुंबई- अहमदाबाद रेल्वेची गरज आहे. ही लोकल सुरू झाल्यास मुंबईची ओळख द्विगुणीत होईल. हा प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा ही आमची प्राथमिकता आहे, असंही त्यांनी सांगितलं.

400 नव्या वंदे भारत ट्रेन सुरू होणार

आपल्या देशात जेवढे लोक रेल्वेतून प्रवास करतात, तेवढी तर काही देशांची लोकसंख्याही नाही. तरीही आपण भारतीय लोकलला सुरक्षित आणि आधुनिक बनवत आहोत. आपलं तेच प्राधान्य आहे. 8 हजार रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिशन केलं आहे. साडेचार हजार किलोमीटरमध्ये नव्या लाईन तयार केल्या आहेत किंवा आधुनिककरण केलं आहे. स्टेशनवर वायफायची सुविधा दिली आहे. वंदे ट्रेनभारतची फॅक्ट्री तयार करण्यात आली आहे. येत्या काळात 400 नव्या वंदे भारत ट्रेन सेवेत सुरू होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

केडीएमसीच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला, भाजपचा कोर्टात जाण्याचा इशारा तर गाव समितीचा बहिष्काराचा इशारा

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

Dombivli Murder | सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.