AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, आता महेश गायकवाड यांचीदेखील चौकशी होणार

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलीस आता याप्रकरणी महेश गायकवाड यांचीदेखील चौकशी करणार आहेत. महेश गायकवाड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती बरी झाल्यावर त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, आता महेश गायकवाड यांचीदेखील चौकशी होणार
mla-ganpat-gaikwad-firing CCTV Fooatage
| Updated on: Feb 09, 2024 | 7:02 PM
Share

सुनील जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संबंधित घटना ही जागेच्या वादातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व 70 जणांवर जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयात चार जणांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने शिरून, जागेवरील कामगारांना शिवीगाळ करत, जागेतील सामानाचा नुकसान केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय.

आमदार गणपत गायकवाड यांच्या ठेकेदारांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात प्रामुख्याने महेश गायकवाड, त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यासह अक्षय गायकवाड, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव यांची नावे एफआयआर कॉपीमध्ये देण्यात आली होती. याप्रकरणी उल्हासनगर चोपडा कोर्टात यामधील चौघांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यांना जामीन मिळाल्या असल्याची माहिती संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र या गुन्ह्यात अजूनही महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह 66 जण फरार आहेत. यातील महेश गायकवाड आणि राहुल पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी इतर 66 जणांची चौकशी सुरू केली आहे. आत्तापर्यंत पाच जणांची चौकशी याप्रकरणी करण्यात आली आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

महेश गायकवाड यांची प्रकृती सुधारतेय

गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन्हीजण गंभीर जखमी झाले होते. दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 तर राहुल पाटील यांच्या शरीरातून 2 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. दोघांची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.